फीसाठी घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही, आई-वडिलांची मुलासह आत्महत्या

फीसाठी घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही, आई-वडिलांची मुलासह आत्महत्या

सेंथिल हे सोनार होते. घरात पैसे कमवण्याचा हा एकमेव पर्याय होता. सेंथिल कुमार यांच्या एका मित्राने त्यांना खूप फोन केले पण त्यांनी फोन उचलले नाही.

  • Share this:

नागापट्टनम (तमिळनाडू)13 जून : घरात आई-वडिल आणि 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या शाळेच्या फीसाठी घेतलेलं कर्ज परत करता आलं नाही म्हणून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली असल्याचा दावा मृतकांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. 35 वर्षीय सेंथिल कुमार अशी मृतकाची ओळख सांगण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेंथिल हे सोनार होते. घरात पैसे कमवण्याचा हा एकमेव पर्याय होता. सेंथिल कुमार यांच्या एका मित्राने त्यांना खूप फोन केले पण त्यांनी फोन उचलले नाही. त्यामुळे त्यांचा मित्र घरी पोहचला आणि त्यानंतर आत्महत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तमिळनाडूच्या नागापट्टनम जिल्ह्यातील वेलिपायम या गावात हा प्रकार घडला आहे. घरात तिघांचा मृतदेह पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी सेंथिलने अनेक मित्रांकडून पैसे उधार घेतले असल्याची माहिती त्यांच्या मित्राकडून देण्यात आली.

पैशांची परतफेड करता आली नाही...

मुलाच्या फीसाठी घेतलेले पैसे सेंथिल यांना परत करता येत नव्हते. त्यामुळे ते सतत चिंतेत असायचेय पैसे जमा करण्याचा कोणताही पर्याय दिसत नव्हता. त्यातही फी भरण्यासाठी पैसे कमी पडत होते. सेंथिल यांचा मुलगा एका नामांकित शाळेमध्ये सहावी इयत्तेत शिकत होता.

हेही वाचा : नवविवाहितेचा जळीत मृतदेह आढळला, माहेरच्यांनी केला हा आरोप

जेवनामध्ये विष कालवून या तिघांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून यामध्ये संथिल यांच्या कुटुंबीयांची त्याचबरोबर त्यांच्या मित्रांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे? पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: June 13, 2019, 4:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading