• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • शिर्डीतील ड्रेसकोडचा वाद चिघळला; साईबाबा संस्थानातील वेशभुषेच्या फलकाला फासलं काळं

शिर्डीतील ड्रेसकोडचा वाद चिघळला; साईबाबा संस्थानातील वेशभुषेच्या फलकाला फासलं काळं

साईबाबांच्या मंदिरात येताना ड्रेसकोड लागू केल्याने अनेक सामाजिक संस्थांनी यावर टीका केली होती.

 • Share this:
  शिर्डी, 7 जानेवारी : काही दिवसांपूर्वी शिर्डीतील साईबाबा संस्थानने लावलेल्या फलकावरुन मोठा गदारोळ उठला होता. त्यानंतर अनेक सामाजिक संस्थानी यावर टीका केली होती. दरम्यान आज साईबाबा संस्थानाने लावलेल्या ड्रेसकोडच्या फलकावर काळं फासल्याची माहिती समोर आली आहे. साईबाबांच्या मंदिरात येताना भारतीय पोशाखात येण्याचं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलं होते. (dress code controversy in Shirdi escalated ) साईबाबा संस्थानने वेशभुषेबाबत लावलेल्या बोर्डला काळ फासण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या चर्चेमुळे मोठी टीका केली जात होती. साई मंदिरात येताना भारतीय पोषाखात येण्याचे आवाहन  या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले होते. साईमंदिराच्या गेट क्रमांक 1 जवळील लावलेल्या बोर्डला काळं फासण्यात आलं आहे. या प्रकरणात भुमाता ब्रिगेडच्या तिन‌ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (board of Sai Baba Sansthan was blackened ) यामध्ये दोन महिला आणि एका पुरूष कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यापूर्वीच भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बोर्ड हटवण्याचा इशारा दिला होता. 10 डिसेंबर रोजी तृप्ती देसाई यांनी फलक हटवणार असल्याचं सांगितलं होतं. (dress code controversy in Shirdi escalated ) मात्र पोलिसांनी तृप्ती देसाईला ताब्यात घेतल्याने ती शिर्डीला येऊ शकली नाही. याशिवाय भुमाता ब्रिगेडने 31 डिसेंबर पर्यंत बोर्ड हटवावे असा इशाराही दिला होता. आज काही कार्यकर्त्यांनी येथील ड्रेसकोडच्या बोर्डाला काळं फासल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे. हे ही वाचा-पुणे जिल्ह्यातील जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात आलं वीरमरण डिसेंबर महिन्यात तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारचे नियम लादले ही लोकशाहीचं उल्लंघन आहे. त्यामुळे संस्थानाने 31 डिसेंबरपर्यंत बोर्ड हटविण्याचं अल्टीमेटम दिलं होतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: