मतदानाला 2 दिवस असताना अमरावतीत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी, हे आहे कारण

मतदानाला 2 दिवस असताना अमरावतीत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी, हे आहे कारण

नवनीत राणांमुळे अमरावतीत लोकसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Share this:

प्रशांतलिला रामदास, प्रतिनिधी

दिल्ली, 15 एप्रिल : पुढच्या दोन दिवसांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी अमरावतीमध्येदेखील मतदान होणार आहे. पण अवघे दोन दिवस उरले असताना अमरावतीमधील लोकसभा निवडणूक पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पाठींब्यावरील उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधतेच्या संदर्भात येत्या 22 तारखेला निर्णय होणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार देण्यात आली आहे. अमरावतीमधील ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांनी केली निवडणूक आयोगाला अशी तक्रार दिली आहे.

पुढच्या दोन दिवसांमध्ये अमरावतीमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवार नवनीत राणा यांनी जोरदार प्रचारदेखील केला आहे. पण निवडणूक पुढे ढकलण्याच्या या तक्रारीमुळे आता वेगळाच वाद अमरावती मतदारसंघात निर्माण झाला आहे.

दुर्गम मेळघाटात सुनिल शेट्टींचा नवनीत राणांसाठी रोड शो

आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी यांनी मेळघाटातील धारणी येथे रोड शो केला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अतिशय दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेला मेळघाटात हा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवारांसाठी नेहमीच निर्णायक ठरतो.

'जो व्यक्ती लोकांच्या विकासासाठी झटतो, ज्या उमेदवाराची विजयी होण्याची मला खात्री असते त्याच्याच प्रचारासाठी मी जात असतो म्हणून या वेळी मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी नवनीत राणा यांना खासदार म्हणून निवडून द्या' असं आव्हान सुनिल शेट्टी यांनी केलं. सुनील शेट्टी यांनी चिखलदरा, सेमाडोह, धारणी आणि चुरणी इथेसुद्धा रोड शो केला.

हेही वाचा: हवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून

मेळघाटातील अनेक प्रश्न शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सोडवले नसून आदिवासींचे वीज, पाणी, रस्ते, कुपोषण, पुनर्वसन यांसारखे मुलभूत प्रश्न  सोडवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्न करतील असं शेट्टी म्हणाले.

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचं नातं आहे. कुठल्याही अडचणीच्या काळात ते मदतीसाठी तत्पर असतात असंही सुनिल शेट्टींनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

First published: April 15, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading