कांद्याचे दर गगनाला भिडले, भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल!

या भाव वाढीचा फटका शहरातील ग्राहकांना बसू नये यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं असून भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडमार्फत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमधून खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर मोठ्या शहरात पाठवला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 04:08 PM IST

कांद्याचे दर गगनाला भिडले, भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल!

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 29 ऑगस्ट : बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कांद्याने प्रती क्विंटल अडीच हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. कांद्याच्या भावात वाढ होताच नेहमीप्रमाणे सर्व थरातून ओरड देखील सुरू झाली आहे. या भाव वाढीचा फटका शहरातील ग्राहकांना बसू नये यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं असून भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडमार्फत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमधून खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर मोठ्या शहरात पाठवला जाणार आहे.

कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर त्याचा जास्त फटका मोठ्या शहरातील ग्राहकांना बसू नये याची खबरदारी घेत केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागांतर्गत असलेल्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, कळवणसोबत पुणे, अहमदनगर आदी भागातून एप्रिल महिन्यात तब्बल 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करून साठवण्यात आला होता. त्यावेळी कांद्याला फारच कमी भाव मिळत होता.

मात्र, दुष्काळी परिस्थिती त्यानंतर पावसाचा लहरीपणा आणि यात कांदा पिकवणाऱ्या राज्यात झालेली अतिवृष्टी आदीमुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. एकीकडे आवक कमी तर दुसरीकडे मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेड मार्फत खरेदी करून साठवलेला कांदा दिल्लीसह इतर मोठ्या शहरात पाठवला जात आहे.

बळीराजासमोर 'मोठं' संकट, ग्राहकांना दरवाढीचा फटका मात्र व्यापाऱ्यांची चांदी!

Loading...

शेतकऱ्यांच्या समोरील संकटं काही संपता-संपत नाही आहेत. यंदा उशिरा दाखल झालेला पाऊस त्यात हवामानत सतत होणारे बदल यामुळे शेतकरी आता हतबल झाला आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता तो खराब होऊन सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाची रिपरिप आणि बदलत्या हवामानाचा फटका चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसत असल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या - एकत्र वेळ घालवण्यासाठी डेटिंगवर गेलं कपल, अज्ञातांनी प्रेयसीचं केलं अपहरण!

चार महिन्यापूर्वी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पुढे भाव वाढतील या आशेवर मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवलेला होता. दोन आठवड्यापासून कांद्याची आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इतर बातम्या - दारूच्या नशेत बहिणीसमोर उलगडला आईच्या हत्येचा कट, सुपारी देऊन जन्मदातीला संपवलं!

या सगळ्याचा परिणाम म्हणजे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2300 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. भावात वाढ झाल्याचं पाहून शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा काढण्यास सुरुवात केली. मात्र, बदलत्या हवामानामुळे चाळीतील निम्मा कांदा खराब झाल्याचं पाहून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

VIDEO: लालबागमध्ये राम मंदिराचा देखावा, पाहा EXCULSIVE दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...