छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा अखेर मृत्यू

छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा अखेर मृत्यू

शाळा सुटल्यानंतर चार वाजता ती मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 30 जुलै : टवाळखोराच्या छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. 25 जुलै रोजी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा या मुलीने प्रयत्न केला होता. नंतर तिला  स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

केज तालुक्यातील गप्पेवाडी गावांतील एक 16 वर्षांची मुलगी ही मामाच्या गावी शिक्षणासाठी राहत होती. 10वी च्या वर्गात शिक्षण घेत असताना तिला जवळच्या  शिंदी गावात शाळेला शिक्षणासाठी जावं लागत होतं. याच वेळी गावातील टवाळखोर मुलं हे तिला अडवून त्रास देत असतं. घरातील लोकांना सांगूनही त्या मुलांचा त्रास काही कमी झाला नाही. उलट त्या मुलांनी तुझ्या मामाला जीवे मारू आशी धमकी दिल्याने त्या मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या केलेल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

गावातील अशोक रामदास केदार (19) या टवाळखोराने शाळेत तिची छेड काढली होती. हा प्रकार तिने आपल्या मामाला सांगितल्यानंतर मामाने गावात बैठक बोलून सर्वांसमोर त्या मुलाला समजावून सांगितले होते. व पुन्हा असा प्रकार करु नये म्हणून मामाने त्या मुलाच्या पालकांनाही सांगितले होते. मात्र त्यानंतर चार दिवसांनीच आरोपी आशोक रामदास केदार याने पुन्हा शाळेत जावून तिची छेड काढली. तसेच मामाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे शाळा सुटल्यानंतर चार वाजता ती मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती घरात पडलेली पाहून लहान मुलीने आरडा ओरड केल्यानंतर तिला उपचारासाठी तत्काळ आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

दिड कोटी खर्च करून बांधला बंधारा, एकाच पावसात वाहून गेला

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात आरोपी आशोक रामदास केदार याच्या विरुध्द कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी आशोक हा फरार झाला असून आरोपीच्या भावासह आईला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला यांनी सांगितलं.

या प्रकरणामुळे महिलां मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे. तसेच  छेडखानी मुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना  शिक्षण बंद करावा लागलं आहे. अशा प्रकाराला थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर उपायोजना करावी अशी मागणी पालकांकडून होतेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 30, 2019, 7:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading