Home /News /news /

भीषण! मृत बापाचे पाय कमरेला बांधले आणि मुलाने बाईकवरुन केला 20 किलोमीटरपर्यंत प्रवास

भीषण! मृत बापाचे पाय कमरेला बांधले आणि मुलाने बाईकवरुन केला 20 किलोमीटरपर्यंत प्रवास

ही घटना पाहून कोणलाही धक्काच बसेल.

    भुवनेश्वर, 26 मे : ओडिसातील नुपडा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जी घटना पाहून कोणलाही धक्काच बसेल. मंगळवारी रात्री जिल्ह्याचे सिनापाली आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मिळत नसल्याने मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुलगा भटकत राहिला. मात्र काहीही करून रुग्णवाहिका मिळालीच नाही. शेवटी मुलाला बाईकवर मृतदेह बांधून घेऊन जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, बोडेन ब्लॉक अंतर्गत करंगमाल गावाचे निवासी 60 वर्षीय जुगल किशोर माझीला मंगळवारी सायंकाळी चार वाजता श्वास घ्यायला त्रास होत होता. तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना सिनापाली येथील आरोग्य केंद्रात नेलं. तेथे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट येण्यापूर्वीच सायंकाळी सहा वाजता जीव सोडला. त्यानंतर त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, जुगल यांना ऑक्सिजन देण्यात आलं नाही. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतकाच्या कुटुंबीय रुग्णालयात डॉक्टरांकडे विनवणी करीत राहिले. मृतदेह घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करण्याचीही विनंती केली. जुगल यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र तरीही रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत पुरविण्यात आली नाही. शेवटी रात्री उशिरा मुलाने वडिलांचा मृतदेह बाईकवर बांधला आणि 20 किमी दूर आपल्या गावी घेऊन गेला. हे ही वाचा-कोणाच्या हाता-पायावर खिळे ठोकले, तर रात्रभर मारहाण; पोलिसांचं धक्कादायक रुप मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे दोन्ही पाय समोर बांधले आणि मृतदेह मध्ये ठेवला. एकीकडे सरकार शेवटच्या गावापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे अशा घटना समोर आल्यानंतर सर्व दाव्यांची पोलखोल होत आहे. यावर डॉक्टरांचं म्हणणं आहे की, यावेळी डॉक्टरांनी मुलाला बाईकवरुन मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला, मात्र त्याने ऐकलं नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, Death

    पुढील बातम्या