Home /News /news /

घरात सहज वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत भयंकर धोकादायक; परिणामांबद्दल वाचून बसेल धक्का

घरात सहज वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत भयंकर धोकादायक; परिणामांबद्दल वाचून बसेल धक्का

Side Effects Of Plastic : डॉ.शर्मा यांनी शक्य तितक्या लवकर प्लास्टिकचा वापर थांबवावा, अशा सल्ला लोकांना दिला आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. त्यापैकी काही जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : आताच्या जीवनशैलीमध्ये  प्लॅस्टिक आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंपैकी एक महत्त्वाची वस्तू बनलं आहे.  मात्र, हा वापर करताना प्लॅस्टिकमुळं पर्यावरणाबरोबरच आपल्या आरोग्याला किती नुकसान होतं, याकडे दुर्लक्ष होत आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी आम्हाला इशारा देत असतं. तरीही आम्ही प्लास्टिकबाबत फार काळ दक्षता घेऊ शकत नाही. याचं कारण आपल्याला प्लास्टिक वापरण्याची सवय झाली आहे, हेही असू शकतं. आज, आमचे खाद्यपदार्थ असो, किंवा कोणतीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची काहीही वस्तू असो, आम्ही या सर्व कामात प्लास्टिकच्या वस्तू वापरतो. नवभारत टाइम्स डॉट कॉमच्या बातमीनुसार, सत्यवादी राजा हरिश्चंद्र हॉस्पिटल, दिल्लीचे ज्येष्ठ रहिवासी डॉ. पर्व शर्मा (Dr Parv Kumar Sharma) यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल (Side Effects Of Plastic) माहिती दिलीय. डॉ.शर्मा यांनी शक्य तितक्या लवकर प्लास्टिकचा वापर थांबवावा, अशा सल्ला लोकांना दिला आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. त्यापैकी काही जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. जन्मजात विकार होण्याचा धोका (birth disorder) डॉ पर्व यांच्या मते, प्लास्टिकच्या वस्तू अनेक विषारी पदार्थांनी बनलेल्या असतात, जे मानवी शरीरासाठी चांगले नसतात. यामध्ये शिसं, पारा आणि कॅडमियम असतात, ज्यांचा संपर्क येताच अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. यांच्याशी थेट संपर्क आला तर, जन्मजात विकारांचा धोका असतो. आईपासून किंवा आईच्या माध्यमातून मुलापर्यंत पोहोचणारेही काही विकार असतात. असे विकार मुलाला त्याच्या जन्मापासूनच असतात. डॉक्टरांच्या मते, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करणारे कण प्लास्टिकमध्ये सापडले आहेत. हे वाचा - Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्क बनला कुस्तीचा आखाडा! कोणाच्या हाती येणार घराची सत्ता? प्लास्टिकमधील विषारी पदार्थ ज्या प्लॅस्टिकचा अन्नाचं पॅकेजिंग करण्यासाठी, पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये सर्वात जास्त घातक असलेलं BPA बिस्फेनॉल ए विष आढळतं. हे विष पाण्याला प्रदूषित करतं, नंतर ते तलावाच्या माशांकडे जातं आणि नंतर लोकांच्या आतड्यांपर्यंत पोहोचतं. यामुळं आपल्या आरोग्याची स्थिती खालावत आहे. याव्यतिरिक्त, आपण वापरल्यानंतर प्लास्टिक पिशव्या फेकतो, ती पर्यावरणासाठी एक गंभीर समस्या आहे. त्यानं जमीन प्रदूषित होते. याव्यतिरिक्त, वनस्पती आणि पिकांच्या वाढीस आणि उत्पादनास ते हानीकारक आहे. हे वाचा - अकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका डॉ पर्व यांच्या मते, प्लास्टिकच्या वापरामुळं दमा आणि फुफ्फुसांचा कर्करोग (pulmonary cancer) या दोन प्रमुख आजारांचा सर्वात मोठा धोका आहे. खरं तर, व्यक्तीला प्लास्टिकमध्ये असलेल्या विषामुळं दम्याच्या समस्या उद्भवू शकते. तर, याच्या धुरामुळं फुफ्फुसांचा कर्करोग होतो. यात श्वास घेण्यास त्रास होतो. आपण प्लास्टिक जाळतो, त्यातून विषारी वायू बाहेर पडतो. याच्यामुळं हा कर्करोग होतो. प्लास्टिकमुळं मूत्रपिंड आणि यकृताचंही नुकसान डॉ पर्व यांनी प्लास्टिकमुळं मूत्रपिंड आणि यकृताचंही नुकसान होत असल्याचंही आहे. जेव्हा आपण प्लॅस्टिक आवरणात पॅकिंग केलेलं अन्न खातो, ते जास्त काळ तसंच राहतं, तेव्हा प्लॅस्टिकमधील विषारी पदार्थ अन्नात येतात. आपण ते अन्न खातो, तेव्हा हे विषारी पदार्थ थेट यकृतामध्ये पोहोचतात. आपण हे दूषित अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही, ज्यामुळे ते यकृत किंवा मूत्रपिंडात राहते. हे वाचा - अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचां बलात्कार; तिच्या आईनेही सांगितला थरकाप उडवणारा प्रकार मेंदूचं नुकसान प्लॅस्टिक आपल्या मेंदूलाही हानी पोहोचवू शकतं. डॉ. पर्व म्हणतात, अन्नामध्ये प्लॅस्टिकचा दीर्घकाळ वापर करण्यामुळं ते मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतं. यानंतर मेंदू आणि मज्जासंस्थेलाही नुकसान होऊ शकतं. प्लास्टिकचा वापर कसा कमी करावा प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर सुरू करावा. अन्न स्टीलच्या लंच बॉक्समध्ये पॅक करा आणि ते घेऊन जा. स्वयंपाकघरातही प्लास्टिकचे डबे आणि बरण्याऐवजी काचेची भांडी वापरू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Plastic

    पुढील बातम्या