एम. करूणानिधी अनंतात विलीन

एम. करूणानिधी अनंतात विलीन

  • Share this:

तमिळनाडू, 08 ऑगस्ट : द्रमुक अर्थात द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणनिधी यांच्या पार्थिवारी बुधवारी सायंकाळी ७ वाजता चैनईतल्या मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी त्यांचं निधन झालं. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चैनईच्या मरीना बीचवर त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळेस त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मरीना बीचवर नागरिकांनी अलोट गर्दी उसळली होती. दरम्यान, सायंकाळी 6 वाजता करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 2 जणांचा मृत्यू झाला.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधींवर आज मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला पंतप्रधान मोदींनी चेन्नईतल्या राजीजी हॉलवर जाऊन करुणानिधींचं अखेरचं दर्शन घेतलं. करुणानिधींचे सुपुत्र स्टालिन यांचं मोदींनी सांत्वन केलं. द्रमुकचे नेते आणि देशाचे माजी दूरसंचार मंत्री ए. राजाही यावेळी उपस्थित होते. मोदी यायच्या काही वेळ आधी स्टालिन यांना रडू कोसळलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देखील चेन्नईतल्या राजीजी हॉलवर जाऊन करुणानिधींचं अखेरचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी ठेवण्यात आलेले त्यांचे पार्थिव सायंकाळी 7 वाजता एका सोनेरी शवपेटीमध्ये ठेवण्यात आले. यावेळी त्यांची मुलं एमके स्टॅलीन, अलागिरी आणि मुली कनिमोदी आणि सेल्वी हे उपस्थित होते. द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे संस्थापक अन्नादुरई यांनासुद्धा मरीना बीचवर दफन करण्यात आले होते. ते करुणानिधीचे गुरू सुद्धा होते. मरीना बीचवर त्यांच्याच शेजारी सायंकाळी ७ वाजता करुणानिधींना दफन करण्यात आले. मरीना बीचवर उसळलेल्या प्रचंड जनसागराच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि दक्षिण भारतातले प्रसिद्ध नेते करूणानिधी यांचं प्रदीर्घकाळाने निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडू शोकसागरात बुडाला असून, राज्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू असताना त्यांची अखेरची एक झलक पाहण्यासाठी जनता वाट्टेल ते करायला तयार झाली होती. त्यांना नौसेनेच्या जवानांनी अंतिम सलामी दिली. त्तपूर्वी त्याच्या पार्थिवावर टाकण्यात आलेला तिरंगा त्याचा मुलगा स्टॅलीन यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी राहुल गांधी, गुलाबनबी आझाद, वीरप्पा मोइली, डेरेक ओब्रायन, चंद्राबाबू नायडू यांच्यासह देशातील अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा..

आंबोली घाटात ट्रक दरीत कोसळला

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज

बीपीसीएल कंपनी स्फोटात 41 जण जखमी,आग नियंत्रणात

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 08:18 PM IST

ताज्या बातम्या