Home /News /news /

...अन्यथा शिक्षा सुनावण्यात येईल; वरिष्ठ वकील प्रशांत भूषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

...अन्यथा शिक्षा सुनावण्यात येईल; वरिष्ठ वकील प्रशांत भूषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

आता प्रशांत भूषण याबाबत माफी मागणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे

    नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयात आज वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याद्वारे न्यायालयाची अवमान प्रकरणाबाबत चर्चा झाली. कोर्टाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमानतेच्या संबंधित वक्तव्यावर विचार करण्यासाठी दोन दिवस दिल्याचे सांगितले. मात्र प्रशांत भूषण यांनी कोर्टात सांगितले की मला वेळ दिल्यामुळे कोर्टाचा वेळ वाया जाईल. कारण मी माझं वक्तव्य बदलनार नाही. याशिवाय ते पुढे म्हणाले की त्यांना अवमान प्रकरणात कोर्टाकडून स्वत: ला दोषी ठरवल्याबद्दल खूप वाईट वाटलं आहे. लोकशाहीत टीका ही संविधानिक अनुशासन स्थपित करण्यासाठी आहे. माझं ट्विट केवळ देशाचा एक नागरिक म्हणून होते, यातून माझ्यावर असलेली सर्वात मोठी जबाबदारी पार पाडण्याची होती. जनसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे, प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल कोर्टात माफी मागण्यास नकार दिला आहे. मात्र तरीही अटर्नी जनरल केके वेणुगोपाल म्हणाले की कोर्टाने  त्यांना आपल्या वक्तव्यावर विचार करण्यासाठी काही वेळ द्यायला हवा. यावर जस्टिस मिश्रांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बेंचने सांगितले की आम्ही या प्रकरणात तातडीने निर्णय घेणार नाही. आम्ही यावर विचार करण्यासाठी प्रशांत भूषण यांनी 2 ते 3 दिवसांचा अवधी देत आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. प्रशांत भूषण यांना बिनशर्त माफी मागण्याची संधी देण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केल्यास मंगळवारी सुनावणी होईल. जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावेल, असे न्यायालयाने सांगितले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Supreme court

    पुढील बातम्या