Home /News /news /

अरे पकडा त्याला.., एका तरुणाने पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नवी मुंबई फिरवली!

अरे पकडा त्याला.., एका तरुणाने पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नवी मुंबई फिरवली!

पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सीबीडी पोलीस स्टेशन समोर पकडले.

नवी मुंबई, 07 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची पूर्ण खबरदारी घ्यावी लागत आहे. पण, नवी मुंबईमध्ये  एका 25 वर्षीय कोरोनाबाधित संशयित तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील संशयित 25 वर्षीय तरुण हा सीबीडीतील टाटा नगर झोपडपट्टीत राहतो. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन आठवड्यापूर्वी त्याच्या कुटुंबातील 6 सदस्यांना पनवेल मधील इंडिया बुल्स इथं होम क्वारंटाइनमध्ये ठेवलं होतं. मागील 14 दिवस हे सर्व होम क्वारंटाइनमध्ये उपचार घेत होते. हेही वाचा- ...आणि अजितदादा आणि फडणवीस आले एकत्र, पाहा हे PHOTOS मात्र, त्यातील 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी त्याच ठिकाणी थांबण्यास सांगून त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांना बुधवारी सकाळी रुग्णवाहिकेतून  बेलापूर येथे सोडले होते. मात्र, यावेळी कोरोनाबाधित असलेल्या संशयित तरुण देखील त्यांच्या सोबत रुग्णवाहिकेतून बेलापूर येथील टाटा नगर झोपडपट्टीत पोहोचला. त्यामुळे त्याची शोधा शोध सुरू झाल्यानंतर तो रुग्णवाहिकेतून बेलापूर येथे गेल्याची माहिती मिळाली. हेही वाचा- डेटवर गेलेल्या मैत्रिणीला रात्री उशिरा PG मध्ये आणण्यासाठी बोलवली अॅम्ब्युलन्स या तरुणाची माहिती महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना व पोलिसांना देण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलीस त्याचा शोध घेत बेलापूर येथे पोहोचले. त्यामुळे या संशयित तरुणाने आपल्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सीबीडी पोलीस स्टेशन समोर पकडले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर सॅनिटायझरची फवारणी करून त्याला पुन्हा रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवून दिले. या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Police, Youth

पुढील बातम्या