• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • amazon च्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती बस, रस्त्यात कंटेनरवर धडकला

amazon च्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती बस, रस्त्यात कंटेनरवर धडकला

अपघातग्रस्त बसचा चालक मद्यप्राशन केलेला असल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे बोलले जात आहे.

  • Share this:

भिवंडी, 05 ऑक्टोबर : भिवंडी बायपास मार्गावर कामगारांना अ‍ॅमेझॉन (amazon india) कंपनीत कामावर घेऊन जाणाऱ्या बसच्या बसचालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 15 ते 17 कामगार जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांवर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे  तर सात जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भिवंडी तालुक्यातील वडपे येथे असलेल्या अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या गोदामात हजारो कामगार काम करीत असून त्यांना कामावर घेऊन जाण्यासाठी खाजगी बस सुविधा पुरविली जाते. रात्रपाळीत काम करण्यासाठी भिवंडी शहरातील जुना जकात नाका येथून कामगारांना घेऊन खाजगी बस निघाली असता भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील सरवली येथे बसचालकास रस्त्यात उभा असलेला कंटेनर दिसून न आल्याने बसने कंटेनरला ठोकर मारली. हातात खडू पकडायला बोटं नाही, पण प्रतिभा खचल्या नाही; जगण्याला बळ देणारा VIDEO ही धडक इतकी भीषण होती की,  या अपघातात बस मधील बेसावध कामगारांना धक्का बसून ते समोरील सीट वर आदळले गेल्याने तब्बल 15 ते 17 कामगारांना डोक्याला, छातीला, चेहऱ्याला मार लागला असून सर्व जखमी कामगारांवर टेमघर येथील श्रीसाईश रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात जणांना गंभीर दुखापत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेत इतरांना प्रथोमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. शिवसेनेनं जिंकून दाखवलं, सलग तिसऱ्यांदा विजयी होत शिवसैनिकाने भाजपला हरवलं भिवंडी शहरातून दररोज सुमारे 50 खाजगी बस कामगारांची ने-आण करीत असून या बस सुस्थितीत नसणे, प्रशिक्षित चालक नसल्याने व बसमध्ये अधिक संख्येने कामगार बसवू नये, याबाबत नेहमीच ओरड होत असताना वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भाजप शहर सरचिटणीस विशाल पाठारे यांनी केली. या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बसचा चालक मद्यप्राशन केलेला असल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे बोलले जात आहे.
Published by:sachin Salve
First published: