खळबळजनक: ‘कोरना’च्या नावाखाली इंटरनेटवर काळाबाजार, 10 लाखांना विकलं जातंय 1 लीटर रक्त

खळबळजनक: ‘कोरना’च्या नावाखाली इंटरनेटवर काळाबाजार, 10 लाखांना विकलं जातंय 1 लीटर रक्त

अशा प्रकारचा काळाबाजार करणाऱ्या 20 पेक्षा जास्त साईट्स असून त्यातून अशा प्रकारचं रक्त विकण्याचा दावा करण्यात येत आहे.

  • Share this:

रवी सिंह, नवी दिल्ली 10 मे: कोरोनामुळे सध्या सर्व जग हादरून गेलं आहे. जगातल्या 185 पेक्षा जास्त देशांना कोरोनाने बाधित करून सोडलंय. काही लाख लोकांना कोरोनाने ग्रासलंय तर मृत्यूची संख्याही मोठी आहे. कोरोनामुळे सगळयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी कुठलंही औषध अजुन मिळालेलं नसल्यामुळे त्यापासून वाचायचं कसं याची लोक चिंता करत आहेत. त्याच भीतीचा फायदा घेत इंटरनेटवर कोरोनातून बरे झालेल्यांच्या रक्ताचा काळाबाजार करण्यात येत असल्याचं ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

जे लोक कोरोनामुक्त झाले त्यांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबाडीज तयार होतात. अशा व्यक्तिच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोना बाधितांना दिला तर कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवता येतं असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

प्लाझ्मा थेरेपी असं त्याला म्हटलं जातं. जगभर या पद्धतीची चर्चा आहे आणि काही प्रयोगही करण्यात येत आहेत. त्याचा वापर मात्र अजुनही फक्त प्रयोग स्तरावरच होत आहे. असं असतानाच इटंरनेटवर लुटारूंनी याचा काळाबाजार सुरू केला आहे.

अशा प्रकारचा काळाबाजार करणाऱ्या 20 पेक्षा जास्त साईट्स असून त्यातून अशा प्रकारचं रक्त विकण्याचा दावा करण्यात येत आहे. एका लीटरला तब्बल 10 लाख एवढी त्याची किंमत असून त्यासाठीचा व्यवहार हा बिटकॉईन्सच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखता येतं आणि कायम स्वरुपात तुमची इम्युनिटी वाढते असा दावा करण्यात आला आहे.

अशा प्रकराच्या खोट्या दाव्यांना भुलून अनेक जण हे रक्त घेत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. जगभर एवढी जनजागृती करूनही लोक अशा खोट्या जाहीरातीला का बळ पडतात हेच कळत नाही असं मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

First published: May 10, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading