या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाचं एकमत, भाजपनं शिवसेनेवर साधला निशाणा

या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाचं एकमत, भाजपनं शिवसेनेवर साधला निशाणा

काँग्रेस तर्फे 10 हजार प्रतिमाह बलुतेदारांना देण्याची मागणी आहे. त्यामुळे बलुतेदारांच्या प्रश्नांवर काँग्रेस भाजपचे एकमत आहे.

  • Share this:

नागपूर, 18 मे : नागपुरात बलुतेदार अर्थात सुतार नाव्ही, कसबा, लोहार बेलदार इत्यादी लोकांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली असून आता लवकर दुकानं सुरू करा असा आवाज लावण्यात येत आहे. यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं आहे. दारूचं दुकान सुरू करू शकता पण सलूनचं नाही असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

नागपुरात बलुतेदारांची दुकानं सुरू करा असं भाजपचं म्हणणं आहे. तर काँग्रेस तर्फे 10 हजार प्रतिमाह बलुतेदारांना देण्याची मागणी आहे. त्यामुळे बलुतेदारांच्या प्रश्नांवर काँग्रेस भाजपचे एकमत आहे. भाजपचे बंडू राऊत यांनी राज्य शासनाला सवाल केला आहे की, जर दारूचे दुकान सुरू करू शकता तर बलुतेदार यांच्याकडे का दुर्लक्षित केलं जातं आहे.

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

यावर निराशा व्यक्त केली असून परिस्थिती आणखी वाईट होण्याच्या इशारा त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसतर्फे पण बलुतेदार यांच्या समस्येवर केंद्र सरकारला लॉकडाऊनच्या काळात 10 हजार रुपये बलुतेदार यांचा खात्यात टाकण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव गिरीश पांडव यांनी केली आहे. लवकर जर दुकानं सुरू केली नाही तर बलुतेदार हा उपाशी मरेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO

एकीकडे नागपुरात अशा प्रकारे भाजप खवळलं असताना दुसरीकडे भाजप नेते आणि कुलाबा मतदार संघाचे माजी आमदार राज पुरोहित यांनी वानखेडे स्टेडियमवर कोरोना उपचार केंद्र, विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास कडाडून विरोध केला आहे. मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशारा राज पुरोहित यांनी दिला आहे.

क्वारंटाइन सेंटरसाठी स्टेडियम उपलब्ध करुन देण्यास एमसीएने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र, आता भाजपच्या नेत्याने याला विरोध केला आहे.

'...तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल', इम्रान खान यांनी मागितली मदत

First published: May 18, 2020, 9:35 AM IST
Tags: corona

ताज्या बातम्या