मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /...अन् चोप देणारे हात थांबले, चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या चोराला लोकांनी दिले सोडून!

...अन् चोप देणारे हात थांबले, चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या चोराला लोकांनी दिले सोडून!


 'कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो'

'कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो'

'कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो'

    दिवा, 26 जून : लॉकडाउनच्या काळात हातावर काम असलेल्या मजुरांचे अतोनात हाल झाले. गेल्या 3 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे हे मजूर आता गुन्हेगारीकडे वळायला लागल्याची घटना समोर आली आहे. दिवा येथे चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.

    ठाण्याच्या लगत असलेल्या दिवा येथील साबे गावातील डी जी कॉम्पलेक्स इथं एका चोराला नागरिकांनी मोबाइल चोरताना पकडले होतं. नागरिकांनी या तरुणाला चोप दिला आणि बांधून ठेवले. नागरिकांनी बेदम चोप दिल्यानंतर सुटकेसाठी या तरुणाने गयावया केली.

    'कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो. त्यात गेली 3 महिने अक्षरश: उपासमारीची वेळ आली म्हणून मोबाईल चोरला' अशी व्यथाच  या तरुणाने मांडली.

    चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

    दिवा येथे बैठ्या चाळी आहेत. खिडकीत ठेवलेले मोबाईल या भागात सहज सापडतात, त्यांच्यावर आम्ही हात साफ करतो आमची एक मोठी टोळी आहे. जी कळव्यात राहते. आमच्या टोळीने आतापर्यंत या भागात खूप चोऱ्या केल्या आहेत, असंही या चोराने कबूल केलं.

    चोराची ही कहाणी ऐकून नागरिकांचा राग शांत झाला. त्यानंतर ज्या नागरिकांनी या चोराला पकडले होते, त्याचे हात बांधून सोडून दिले आणि कोणतीही पोलिसांमध्ये तक्रार केली नाही.

    संपादन - सचिन साळवे

    First published:
    top videos

      Tags: Diva, Thane