तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी याची नशा करण्यावर आणली होती बंदी; आज देशभरात होतेय चर्चा

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी याची नशा करण्यावर आणली होती बंदी; आज देशभरात होतेय चर्चा

देशात या नशेवर कधी बंदी आणली, त्यामागील कारणं काय आहेत..त्याचे अनेक पैलू...वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले आहेत. यानंतर संपूर्ण प्रकरण आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनपर्यंत येऊन ठेपलं आहे. कालपर्यंत एनसीबीकडून अनेक प्रसिद्ध चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना नोटीस पाठविण्यात आल्यानंतर 'गांजा' या अमली पदार्थावर पुन्हा एक चर्चा होत आहे.

वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2016 च्यानुसार जगात 54% गांज्याचं सेवन केलं जातं. एमफेटामाइन (नशेची गोळी 17%, कोकेनचं 12%, हिरोइनचं 12% सेवन केलं जातं. राजीव गांधी सरकारकडून अमेरिकेच्या दबावामुळे भारतात गांजा घेण्यावर बंदी आणण्यात आली होती. दुसरीकडे या नशेच्या खरेदीमुळे सर्वाधिक कमाई होते. जगातील अनेक भागात अमली पदार्थांच्या विक्रीतून मोठी कमाई केली जाते. तर भारतात यावर बंदी घातल्यामुळे तस्करीच्या माध्यमातून विक्री सुरू आहे. आता विचार करण्यासाठी गोष्ट आहे की जर एका झाडामुळे भांग, हशीस आणि गांजा या तिन्ही गोष्टी तयार होतात, तर भांग सहजपणे विकली जाते आणि गांजा-हशीशवर इतकी बंधनं का आहेत?

यामागे कदाचित भांगचं धार्मिक कनेक्शन हे कारण असू शकतं. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शंकराला भांग, बेल पत्र आदी अर्पण केलं जातं. यासाठी भांग एक प्रकारे शंकराचा प्रसाद मानला जातो. याचं थंड पेय म्हणून प्यायलं जातं. याच्या नशेमुळे माणसाचा मेंदू सुस्तावतो. याचं अधिक सेवन अनेकदा जीवघेणंही ठरू शकतं., मात्र या भांगेसोबत असलेल्या धार्मिक मान्यतांमुळे याची खूप चर्चा होते.

हे ही वाचा-ड्रग्जप्रकरणी 6 महिन्यांतच दाखल होणार चार्जशीट; बडे सेलिब्रिटी NCB च्या रडारवर

शिवरात्र आणि होळीला भांगेपासून तयार केलेल्या थंड पेयावर प्रश्न उपस्थित केला जात नाही. तर भांगेमधून मिळणारे दुसरे पदार्थ गांजा व हशीस याच्या वापरावर एखाद्याला 1 वर्ष तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो. एकाच झाडापासून गांजा-भांग हे पदार्थ मिळतात. ज्याची पानं वाटून भांग तयार केली जाते. तर भांगेच्या रोपट्याची फुलं आणि फुलांजवळील पानं सुकवून गांजा तयार केला जातो. तर याच गांजाचा वापर तंबाखूप्रमाणे चिलम वा सिगारेटच्या रॅपमधून नशेसाठी केला जातो.

हे ही वाचा-करण जोहरचं नाव घेतलं तरच...' ड्रग्ज प्रकरणात क्षितीज प्रसादचा NCB वर आरोप

अमेरिकेच्या दबावामुळे भारताने 1985 मध्ये नार्कोटिक्स आणि साइकोट्रॉपिक सब्सटॅंस अॅक्टमध्ये भांगेच्या रोपट्याला (कॅनबिस) आलेली फळ आणि फुलांचा वापर क्राइमअंतर्गत जारी करण्यात आला. तर याच्या पानांवर कोणतीही बंदी आणली नाही. 1961 मध्ये नार्कोटिक्स ड्रग्जवर झालेल्या संमेलनात भारताने या झाडाला हार्ड ड्रग्सच्या श्रेणीमध्ये ठेवण्यास विरोध केला होता, त्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे भारताने हा निर्णय घेतला.

देशातील काही राज्य उदाहरणार्थ आसाममध्ये भांगेचा वापर आणि पजेशन बेकायदेशीर आहे. तर महाराष्ट्रात परवाना नसताना भांगच्या रोपट्यांची शेती करणं, स्वत:जवळ बाळगणं, त्याचा वापर करणं त्याच्यापासून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करणे बेकायदेशीर आहे. सरकारी आकड्यांनुसार भारतात तब्बल 3 टक्के लोकसंख्या म्हणजे 3 कोटींहून अधिक लोकांनी 2018 मध्ये कॅनबिजचा वापर केला. इस्त्राईल बेस्ट फर्म सीडोच्या एका अभ्यासानुसार दिल्लीत 2018 मध्ये 32.38 मेट्रिक टन कॅनबिजची विक्री झाली. कॅनबिजचं समर्थन करणाऱ्या एका थिंक टँकच्या गेल्या महिन्याच्या रिपोर्टनुसार जर यावर टॅक्स लावला गेला तर सरकारला 725 कोटी रुपयांची कमाई होईल.

Published by: Meenal Gangurde
First published: September 28, 2020, 5:47 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या