मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

  • Share this:

मुंबई, 22 जून :  मंत्रालयाच्या परिसरात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीये. गौतम चव्हाण या व्यक्तीने मंत्रालयाच्या गेटसमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

मंत्रालयात पुन्हा एक आत्महत्या

झोपडपट्टी पुर्नविकास योजनेत प्रलंबित कामासाठी गौतम चव्हाण हे मंत्रालयात आले होते. पण काम होत नसल्यामुळे या रागातून मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी गेटवर विष प्राशान केलं. सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन गौतम चव्हाणांना अडवलं. पण विष प्यायल्यामुळे त्यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आलंय.

मंत्रालयात 80 वर्ष वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न

याआधीही जानेवारी महिन्यात धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने  विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून हर्षल रावते या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 08:56 PM IST

ताज्या बातम्या