दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला, फावड्यानं तोडले पाय

दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला, फावड्यानं तोडले पाय

दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

मोहन जाधव (प्रतिनिधी),

रायगड, 18 मार्च:दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर दरोडेखोरांनी हल्ला करून फावड्याने त्यांचे पाय तोडले आहेत. माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

हेही वाचा...VIDEO: नवी मुंबईत डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे यांच्या पायावर दरोडेखोरांनी फावड्याने घाव घातल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात दोन्ही पोलिसांच्या पायाचे हाड मोडले आहे. त्यांना माणगाव उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात सगळीकडे नाका बंदी करण्यात आले आहे.

अपघात करून पळून गेल्याची चौकशी करण्यास गेले होते पोलिस...

किरकोळ अपघात होऊन वाहन चोरी करून पळून जाणाऱ्याना त्याच्या घरी जाऊन चौकशी करण्यास गेले असता अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि चालक पोलीस हवालदार टेकाळे हे दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करणारे फरार झाले असून त्यांचा माणगाव पोलीस शोध घेत आहेत. जखमी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा...ट्रान्सफार्मरवर धडकली भरधाव इंडिका कार, भीषण अपघातात चार जण ठार

मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मक्झिमो व इको कारचा किरकोळ अपघात होता. त्यावेळी इको कारचालक व मक्झिमो कारचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर इको कारचालक व इतर जण आपली कार घेऊन पळून गेले. त्याचवेळी रात्रीची गस्ती घालणारे माणगाव पोलीस सहाय्यक निरीक्षक सागर कावळे व वाहन चालक टेकाळे हे दोघे त्याठिकाणी आले. मक्झिमो चालकाने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांनी मक्झिमो कारचालक याला घेऊन इको कार चालक राहत असलेल्या वाढवण या गावात गेले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी इको कारचालक यांचा दरवाजा ठोठावला असता घरातून तीन पुरुष आणि एक महिला बाहेर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करून एका पुरुषाने सागर कावळे याच्या डोक्यात सळी मारून व डाव्या पायावर लाथेने मारले. यामध्ये कावळे हे गंभीर जखमी झाले. तर पोलीस चालक टेकाळे यांच्या पायावर पावड्याने झोड टाकून त्यांनाही जखमी केले.

या प्रकारानंतर कावळे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर माणगाव पोलीस घटनास्थळी पोहचून कावळे आणि टेकाळे याना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे आरोपी हे फरार झाले असून त्याचा शोध माणगाव पोलीस घेत आहेत.

First published: March 18, 2020, 9:43 AM IST

ताज्या बातम्या