S M L

परळीत रस्त्याचे काम सुरू असताना आढळली प्राचीन मूर्ती, संरक्षणासाठी आले नागोबा

ही मूर्ती दिसताच जेसीबी ऑपरेटरने ताबडतोब काम बंद केले. मूर्ती ज्या ठिकाणी निघाली त्याच ठिकाणी एक नाग या मूर्तीजवळ आढळला

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 08:54 PM IST

परळीत रस्त्याचे काम सुरू असताना आढळली प्राचीन मूर्ती, संरक्षणासाठी आले नागोबा

  बीड, 17 एप्रिल : परळी-अंबाजोगाई राज्य रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना कन्हेरवाडी गावच्या पुढे असलेल्या रस्त्याच्या बाजूला माळ रानात आनंदनगर येथे खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आढळली.

ही मूर्ती दिसताच जेसीबी ऑपरेटरने ताबडतोब काम बंद केले. मूर्ती ज्या ठिकाणी निघाली त्याच ठिकाणी एक नाग या मूर्तीजवळ आढळला. या घटनेची माहिती मिळताच परळीचे तहसीलदार शरद झाडके तसेच नायब तहसीलदार सदानंद बरदाळे ह्यानी घटनास्थळी भेट दिली.

या संबंधी पुरातत्व विभागास माहिती देण्यात येऊन त्या संबंधित पुढील कारवाई करण्याच्या सुचना तहसीलदार यांनी दिल्या.

दरम्यान, रस्त्याचे सुरू असलेले खोदकाम हे बंद करण्यात आले. या मूर्ती बाबत परिसरात माहिती पसरताच मुर्ती पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. वाढत जाणारी गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 08:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close