कोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र

कोल्हापूरकरांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आता उस्मानाबादकरांच्या हाती असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2018 12:34 PM IST

कोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र

कोल्हापूर, 30 जुलै : कोल्हापूरकरांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आता उस्मानाबादकरांच्या हाती असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त अधीक्षक आणि सोबतच पोलीस अधीक्षकही आता उस्मानाबादचे असणार आहेत. मराठवाड्यातला एक मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती पण ही ओळख पुसून आता एकाच जिल्ह्यातले दोन सुपुत्र कोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार आहेत. खरंतर हे एक दुर्मिळ उदाहरणच म्हणावं लागेल. मराठवाड्यातला सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणूनही उस्मानाबादला ओळखले जाते.  दुष्काळाच जोखड कायम वाहणारा हा जिल्हा. मात्र याच जिल्ह्यातून दोन अधिकारी घडले आहेत. आणि आता हे दोघंही कोल्हापूरची कायदा सुव्यवस्था हाताळणार आहेत.

FB पोस्ट टाकून तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याचा दावा

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून अभिनव देशमुख यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यांचं मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील पोहनेर आहे. पण आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार आहेत. तर अतिरिक्त अधीक्षक म्हणून तिरुपती काकडे हे कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे. तिरुपती काकडे यांचं गाव रुईभर हे आहे.

उस्मानाबादचे हे दोन सुपुत्र आता कोल्हापूरची कायदा सुवव्यस्था हाताळणार आहेत त्यामुळे हे कोल्हापूरकरांसमोर काय आदर्श ठेवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. त्यांच्या कामाने ते कोल्हापूरकरांचं मन जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभिनव आणि तिरुपती यांच्या कार्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या शुभेच्छा.

हेही वाचा...

27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन

मराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक

VIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2018 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close