मुंबई विमानतळावर विमानाला अपघात टळला

मुंबई विमानतळावर विमानाला अपघात टळला

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान रनवेवरुन घसरल्याची घडलीये.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : मुंबईत पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान रनवेवरुन घसरल्याची घडलीये. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप आहे.

एअर इंडियाचे विजयवाडा-मुंबई एअर विमान दुपारी 2.15 च्या सुमारास रनवेवर उतरले. मात्र, हे विमान उतरताना रनवेवरून पुढे गेले. विमान  पुढे जाऊन मातीत फसले. या दुर्घटनेत सर्व प्रवाशी सुखरूप आहे. विमान नेमके रनवे सोडून पुढे कसे गेले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र,  या प्रकरणाची एअर इंडियाकडून सुरू आहे.

कालपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे तर अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे.

दरम्यान, मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.  मुसळधार पाऊसमुळे रेल्वेरूळावर पाणी साचल्यानं भाईंदर ते विरार रेल्वेसेवा पूर्णपणे बंद आहे. भाईंदर ते चर्चगेट रेल्वेसेवा धीम्या गतीनं सुरू मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेऊन मुख्यध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते बोरीवली रेल्वे वाहतूक ठप्प, नालासोपारात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.

Mumbai Rains: मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट

मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे गाड्याही उशिराने धावत आहेत. या सर्वाचा फटका विमान प्रवासावरही झाला. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत विमानतळावर पोहोचता आले नाही. त्यामुळे अनेकांच्या फ्लाइट चुकल्याही. पण जेट एअरवेजने त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

ट्रेनपासून ते प्लेनपर्यंत मुंबईतील पावसाचे लेटेस्ट अपडेट

पावसामुळे जे प्रवासी योग्यवेळी विमानतळावर पोहचू शकले नाहीत, त्यांची जेट एअरवेजने दुसरी तरतूद केली आहे. मुंबईकडून जाणारे प्रवाशी त्यांच्या सोयीनुसार फ्लाइटची तारीख, वेळ बदली करु शकतात. दुसरी फ्लाइट घेतल्यावर प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, मुंबईतील पावसामुळे अनेक फ्लाइट उशिराने उडत आहेत. त्यामुळेच सर्व प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वीच त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याबद्दल आम्ही सांगतो. तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी वेळेचं योग्य नियोजन करुन घरातून थोडे आधीच निघावे. यामुळे ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय चेक- इन, सुरक्षेची चाचणी आणि बोर्डिंग करु शकतात.

(संग्रहित छायाचित्र)

 

(सविस्तर बातमी लवकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 05:45 PM IST

ताज्या बातम्या