Home /News /news /

अवघ्या 20 वर्षांचा मुलगा ठरला Youngest Tattoo Artist; आता कमावतोय लाखो रुपये

अवघ्या 20 वर्षांचा मुलगा ठरला Youngest Tattoo Artist; आता कमावतोय लाखो रुपये

लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, असं वारंवार सांगण्यात येतं. कित्येक पालक मात्र याकडे दुर्लक्ष करुन मुलांच्या मागे ठराविक करिअर्सचाच हट्ट धरतात. पण, इतर गोष्टींमधूनही चांगल्या प्रकारे कमाई करता येऊ शकते

    नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, असं वारंवार सांगण्यात येतं. कित्येक पालक मात्र याकडे दुर्लक्ष करुन मुलांच्या मागे ठराविक करिअर्सचाच हट्ट धरतात. पण, इतर गोष्टींमधूनही चांगल्या प्रकारे कमाई करता येऊ शकते हे नैनितालच्या एका तरुणाने (Tattoo artist from Nainital) दाखवून दिले आहे. एकदम हटके असा व्यवसाय करुन हा 20 वर्षीय तरुण (20 Year old tattoo artist India) महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमवत आहे. करन कुमार आर्य असं नाव असलेल्या या तरुणाचा व्यवसाय आहे – टॅटू बनवणे! गुड रिटर्न्स डॉट इन या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. करनचे वडील हरीश्चंद्र आर्य हे नैनीतालच्या एका सरकारी रुग्णालयात ड्रायव्हर म्हणून काम करतात. करनने मोठं होऊन डॉक्टर व्हावं, अशीच त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. यामुळे करनने बारावीला बायोलॉजी विषय घेतला खरा, पण त्याचं मन मात्र दुसरीकडेच होतं. करनला लहानपणापासून ड्रॉईंगची आवड होती. त्याने बऱ्याच स्पर्धाही जिंकल्या होत्या. यातूनच त्याच्या मनात टॅटू आर्टिस्ट (India’s Youngest Tattoo artist) बनण्याचा विचार आला होता. आपला हा विचार जेव्हा त्याने घरी सांगितला, तेव्हा त्याच्या आई-वडिलांना दुःख झाले. कारण यामधून पुरेसे पैसे मिळतील का याची त्यांना खात्री नव्हती. मात्र, काही प्रस्थापित टॅटू आर्टिस्टनी (India Tattoo artists) त्यांना फोन करुन त्यांचं मन वळवलं. हे ही वाचा-अवघ्या 10हजार रुपयांत घरीच सुरू करा हा व्यवसाय;महिन्याला होईल 30 हजार रुपये कमाई दरम्यान, कॉलेजमध्ये असल्यापासूनच करन फ्रीलान्स टॅटू आर्टिस्ट (Freelance tattoo artist) म्हणून काम करत होता. केवळ हेच असं काम होतं, जे मी बोर न होता दिवसभर करू शकत होतो, असं करनने एका मुलाखतीत सांगितलं आहे. सुरुवातीला आपल्याला यात बरीच अडचण आली. पण लखनऊला (Lucknow tattoo artist) आल्यानंतर माझ्या कामाला चांगली ओळख मिळू लागली. लखनऊमधील एका बिझनेसमॅनने करनचा एक टॅटू सोशल मीडियावर पाहिला. हे पाहूनच त्याने करनला टॅटू पार्लर उघडण्यासाठी मदत केली. त्यावेळी करनकडे अवघे 20 हजार रुपये होते. मात्र, या व्यावसायिकाने केलेल्या मदतीने त्याने रिप्ले टॅटू स्टुडिओ (Replay tattoo studio) उभारला. गुड रिटर्नने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कमी अनुभव असला, तरी करनचे युनिक डिझाईन्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले. इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या (India Book of World records ) पॅनलमधील अधिकाऱ्यांनाही हे डिझाईन्स आवडले, आणि देशातील सर्वात कमी वयाचा (Youngest tattoo artist) टॅटू आर्टिस्ट म्हणून त्याचं नाव नोंदवलं गेलं. करन एका टॅटूसाठी एक हजार ते साठ हजार रुपये एवढे चार्जेस आकारतो. यातूनच तो आता महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.
    First published:

    Tags: Business, Tattoo

    पुढील बातम्या