मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

...ती आमची शेवटची भेट,आजींबद्दल सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, शेअर केला जुना PHOTO

...ती आमची शेवटची भेट,आजींबद्दल सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, शेअर केला जुना PHOTO

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 12 ऑगस्ट :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक जुना ठेवा, ट्वीटरवर शेअर केला असून अत्यंत भावूक असा संदेश लिहिला आहे. शरद पवार यांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. त्यावेळी आपलं वय तेव्हा सहा वर्षांचे होते, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. 'माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज 45 वर्षे झाली. मला ती आजही आठवते, मी सहा तर अभिजीत 4 वर्षांचे असताना विजू अक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या.' अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. 'ज्यावेळी त्यांची भेट झाली होती, तेव्हा आम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट' असं सांगून सुप्रिया सुळे यांनी आपली भावना व्यक्त केली. Good News, वीज बिलाबाबत आजच ठाकरे सरकार करणार महत्त्वाची घोषणा? शारदाबाई पवार या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रीय नेत्या होत्या. शरद पवार यांना राजकारणाचे बाळकडू हे त्यांच्या आईकडूनच घरात मिळालं होतं. शरद पवारांचं राजकारण हे काँग्रेसमधून सुरू झालं असलं तरी त्याच्या मातोश्री शारदाबाई पवार या मात्र, शेकापमध्ये होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाच्या त्या सदस्यही होत्या. उस्मानाबादेत लॉकडाउनचा नवा आदेश, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ आईच्या संस्कारांमुळे पवार कुटुंबीय सुरूवातीपासून सत्यशोधक आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली राहिलं. सामाजिक कार्याचा वारसा सुद्धा आईने पवारांनाच दिला. पवार कुटुंबाच्या पहिल्या पिढीत एकटे शरद पवारच राजकारणात उतरले तर इतर भाऊ शेती आणि उद्योग व्यवसायात व्यग्र झाले.
First published:

Tags: सुप्रिया सुळे

पुढील बातम्या