दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

बीड, 04 नोव्हेंबर : दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या भीषण अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील बुखारी शाळेजवळ आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. भर दिवसा रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.

दोन्ही दुचाकी समोरून वेगात येत होत्या. दोघांची जोरात धडक झाली. या धडकेमध्ये तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. गणेश श्रीकिसन मिसाळ ( वय 30 रा.देवळा (पुनरवसन) ता.सेलु जि.परभणी) यांचा मयतात समावेश असून दोघांची ओळख पटलेली नाही. तर शंकर जितु भोसले, अजित भोसले (दोघे रा.केकत  पांगरी ता.गेवराई) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडताच स्थानिकांनी जखमींना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 3 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

इतर बातम्या - पतीनंतर प्रियकरानेही साथ सोडली, आता फोटोसोबत 'ती' घेणार सप्तपदी!

भर रस्त्यात अपघात झाल्यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. तर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून अपघाती वाहनं बाजूला केली असून आता स्थानिकांची चौकशी करत आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताविषयी माहिती देण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या - साता जन्माच्या गाठी अर्ध्यावरच सुटल्या, पत्नीच्या खूनानंतर पतीने...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading