ठाणे जिल्हा परिषदेवर 20 वर्षांनंतर भगवा फडकला

ठाणे जिल्हा परिषदेवर 20 वर्षांनंतर भगवा फडकला

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल 20 वर्षानंतर सत्ता स्थापन केली.

  • Share this:

14 डिसेंबर : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल 20 वर्षानंतर सत्ता स्थापन केली. 27 जागा जिंकत सेनेनं जिल्हा परिषदेवर भगवा फडकावलाय.

ठाणे जिल्हा परिषदेच्या  52 जागा आणि पाच पंचायत समित्यांसाठी बुधवार  झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. भाजपला धक्का देत शिवसेनेनं आघाडी घेतली आहे.

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल 20 वर्षांनंतर सत्ता स्थापन केली. 27 जागा जिंकल्यात. या विजयानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या परिसरात आनंदोत्सव साजरा केला.

तर शहापूर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. शहापूरमध्ये भाजपचा धुव्वा उडालाय. जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी ९ सेना आणि ५ राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. पंचायत समितीच्या २८ जागांपैकी सेनेला १८, राष्ट्रवादीला ६, भाजपच्या वाट्याला अवघ्या ३ तर अपक्षाला १ जागा मिळाल्या आहेत.

First published: December 14, 2017, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading