मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ठाण्यात पावसाने घेतली पहिला बळी, घोडबंदर रोडवर एकाचा मृत्यू

ठाण्यात पावसाने घेतली पहिला बळी, घोडबंदर रोडवर एकाचा मृत्यू

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

ठाणे, 04 ऑगस्ट : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांना आता अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकणी पाणी साचल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या पोलचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे.   या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

नाशिककरांची मान शरमेनं झुकली, ग्लोबल हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना, VIDEO व्हायरल

तर दुसरीकडे घोडबंदर रोड येथील तुळशी धाम येथे झाडं आणि विद्युत पोल कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवसाथपन आणि अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहे.

पश्चिम महामार्गावर दरड कोसळली

दरम्यान, कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

पुणेकरांनो, काळजी घ्या! नायडू हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai rain