भारतातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडितला ठाण्यात अटक !

भारतातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडितला ठाण्यात अटक !

कायदा कॉल डिटेल्स रेकॉर्डस अर्थात सीडीआर काढून सीडीआरची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित (५५) यांना अटक केली आहे. त्यांनी आरोपींकडून काही सीडीआर विकत घेतल्या होत्या.

  • Share this:

03 फेब्रुवारी, ठाणे : बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्डस अर्थात सीडीआर काढून सीडीआरची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित (५५) यांना अटक केली आहे. त्यांनी आरोपींकडून काही सीडीआर विकत घेतल्या होत्या. त्यांच्यासह अन्य दोन गुप्तहेरांनाही अटक करण्यात आली आहे. सीडीआर विक्रीच्या माध्यमातून आर्थिक कमाई करणाऱ्या माकेश पांडियन, प्रशांत पालेकर, जिगर मकवाना, समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल या खासगी गुप्तहेरांच्या टोळीला नुकतेच ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती.

आरोपींच्या चौकशीत बेकायदा १७७ सीडीआरची विक्री केल्याची बाब समोर आली होती. शिवाय या रॅकेटमध्ये दिल्लीचा सौरव साहू आणि मुंबईचे क्लिंग मिश्रा, कीर्तेश कवी, शितला शर्मा यांचाही सहभाग असून गुन्हे शाखा त्यांच्याही मागावर आहे. खासगी गुप्तहेरांना साहू सीडीआर काढून देत होता. अटक आरोपींच्या चौकशीत इतरही गुप्तहेरांची नावे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री संतोष पंडागळे (३४, चेंबूर) आणि प्रशांत सोनावणे (३४, नवी मुंबई) या दोघांना अटक केली. तेही यापूर्वी अटक झालेल्या आरोपींकडून सीडीआर घेत होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस नितीन ठाकरे यांनी दिली. ठाणे न्यायालयाने दोघांनाही आठ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी प्रतीक याच्याकडून रजनी यांनी प्रत्येकी १२ हजार रुपयांना पाच सीडीआर विकत घेतल्या आहेत. या सीडीआरचा त्यांनी कशासाठी वापर केला, याबाबत चौकशी सुरू असल्याचेही ठाकरे म्हणाले

पोलिसांनी आरोपींजवळून १७७ मोबाइलधारकांचे सीडीआर हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कुणाचे आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जात होता आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते कुणाला पुरविण्यात आले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

First published: February 3, 2018, 11:53 AM IST

ताज्या बातम्या