• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या?
  • VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या?

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2018 06:05 PM IST | Updated On: Aug 8, 2018 06:05 PM IST

    ठाण्यात एक विचित्र आणि भितीदायक प्रकार समोर आलाय. एक तरुण हातात सुई किंवा टाचणी घेऊन लहान मुलांना टोचतो असं समोर आलाय. ठाण्यातील पाचपाखाडी येथील सरस्वती शाळेजवळ हा प्रकार घडला असून शाळेसमोर एक रस्ता आहे या रस्त्यावर एक तरुण हातात पिशवी घेऊन फिरतोय आणि लहान मुलांना काही तरी टोचतो. हा सर्व प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला. या सीसीटीव्हीतील हा पांढरा शर्ट घातलेला तरुण हातात पिशवी घेऊन फिरतोय हा तरुण रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांकडे बघत बघत चालतोय आणि अचानक तो तरुण त्याच्या हातातील वस्तूने एका मुलाला टोचतो थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर हा तरुण पुन्हा एकदा एका मुलाला हातातील वस्तूने टोचतो आणि परत तिथेच फिरु लागतो. थोड्यावेळ्याने पुन्हा एक महिला आपल्या मुलीला घेऊन येत असताना हा तरुण त्या मुलीच्या खांद्यावर परत त्याच्या हातातील वस्तू ने टोचतो असं तो ३ वेळा करतो आणि नंतर तो तरुण अचानक गायब होतो. हा सर्व प्रकार ६ आॅगस्ट ला घडला असून सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पालकांनी या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केलीये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी