News18 Lokmat

चोराच्या उलट्या बोंबा, मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपचालकांचा संपाचा इशारा

ठाण्यात मापात पाप करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केलीये. उलट पोलीस कारवाई बंद करा अन्यथा बेमुदत बंद पुकारू असा इशाराच पेट्रोलपंप चालकांनी दिलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2017 09:10 PM IST

चोराच्या उलट्या बोंबा, मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपचालकांचा संपाचा इशारा

21 जून : चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात याचा अनुभव आता ठाण्यात येऊ लागलाय. ठाण्यात मापात पाप करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केलीये. उलट पोलीस कारवाई बंद करा अन्यथा बेमुदत बंद पुकारू असा इशाराच पेट्रोलपंप चालकांनी दिलाय.

ठाणे जिल्ह्यात विविध भागात पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाच्या माध्यमातून धाड सत्र सुरू आहे. ठाणे शहर, भिवंडी,कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील पेट्रोल पंपावर धाड टाकून त्याठिकाणी चिप वापरून कसा पेट्रोलमध्ये झोल केला जातो हे समोर आलंय. अशीच धाड आज बदलापूर येथील कात्रप परिसरात असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांच आणि राज्य सरकारच्या वजन मापे विभाग यांनी केली. या पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये पासवर्ड सेट करून आलेल्या ग्राहकांच्या वाहनात कमी पेट्रोल भरलं जायचं.

यात या दोन्ही विभागाने पेट्रोल पंपावरील मशीनची तपासणी केल्या नंतर प्रत्येक पाच लिटर मागे २०० एमएल पेट्रोल कमी येत होतं. या ठिकाणच्या पेट्रोल आणि डिझेलच्या पाच मशीनमध्ये हा झोल तपासणी दरम्यान उघडकीस आला आहे. आता या पेट्रोल पंपाच्या मालकावर गुन्हा दाखल करून पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये पकडल्या गेलेल्या विवेक शेट्टे या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या चौकशी दरम्यान बदलापूरच्या या पेट्रोल पंपाची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...