ठाण्यातून आली दिलादायक बातमी, कोरोनाची नवीन आकडेवारी समोर

ठाण्यातून आली दिलादायक बातमी, कोरोनाची नवीन आकडेवारी समोर

ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या 69 वर पोहोचली आहे.

  • Share this:

ठाणे, 28 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबईलगत असलेल्या ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या देखील दिलासादायक आहे.

प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 27 मे पर्यंत 41 टक्के रुग्ण बरे झाले आहे. तसंच पालिका स्थरावर आणखी पाच ठिकाणी  कोरोनासाठी बेड्सची व्यवस्था करत आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात आता पर्यंत 2294 इतके कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर आतापर्यंत मृत्यूची संख्या 69 च्या घरात गेली आहे.

हेही वाचा -प्रेमाची भयंकर शिक्षा! वडिलांकडून 14 वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या

एकीकडे रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 890 एवढे रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे सध्या 1347 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पालिका आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं आहे.

तसंच कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पालिका स्थरावर कोरोना वॉरिअर्स आशा 600 लोकांची टीम शहरात काम करत आहे. शहरात खबरदारीची उपाय योजना म्हणून सेल्फ डिस्टन्सिंगवर अधिक भर पालिका देत आहे.

आतापर्यंत आढळलेले रुग्ण

1- मुंब्रा प्रभाग समिती -298

2- दिवा प्रभाग समिती- 89

3- माजीवड प्रभाग समिती - 124

4- वर्तक प्रभाग समिती - 122

5- सर्वात जास्त लोकमान्य नगर -सावरकर नगर प्रभाग समिती - 649

6- नौपाडा- कोपरी प्रभाग समिती-264

7- उथळसर प्रभाग समिती - 186

एकूण: 2294

कोविड 19 हॅास्पिटल उभारणीसाठी जागेची पडताळणी सुरू

दरम्यान, ग्लोबल इम्पॅक्ट हब पाठोपाठ आता ठाणे शहर आणि कळवा-खारेगाव येथे नवीन 1 हजार बेड्सचे कोविड 19 हॅास्पिटल उभारणीसाठी जागेची पडताळणी सुरू असून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बुधवारी आनंदनगर ओवळा येथील बस डेपो आणि कासारवडवली येथील बोरिवडे मैदानासह एकूण पाच ठिकाणांची पाहणी केली.

हेही वाचा -अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी? शेतात आढळला गुराख्याचा मृतदेह

ठाणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत एमएमआरडीएच्या माध्यामातून 1 हजार बेड्सचे हॅास्पिटल उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि भविष्यात कोरोनाबाधित रूग्णांसाठी बेडस् कमी पडू नयेत यासाठी ठाणे शहर आणि कळवा परिसरात नव्याने 1 हजार बेड्सचे हॅास्पिटल उभारणीच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून जागेची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 28, 2020, 10:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading