ठाण्याच्या नगरसेवकाची मुंबईत दादागिरी, महिला पत्रकाराशी केले असभ्य वर्तन

ठाण्याच्या नगरसेवकाची मुंबईत दादागिरी, महिला पत्रकाराशी केले असभ्य वर्तन

ठाणे महापालिकेचं नगरसेवक विक्रांत चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे. एका महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरलं झालाय. घाटकोपर मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना ओरडत असल्याचा जाब विचारला म्हणून नगसेवकानं महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केलंय.

  • Share this:

ठाणे, 16 जानेवारी: ठाणे महापालिकेतील नगरसेवक विक्रांत चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे. नगरसेवक विक्रांत चव्हाण महिला पत्रकारांशी गैरवर्तन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे. येवढचं नाही तर विक्रांत चव्हाण  अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हात उगारत असल्याचं व्हिडीओतून दिसतंय. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाणे महापालिकेचे नगरसेवक विक्रांत चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे. विक्रांत चव्हाण यांनी एका महिले पत्रकारवर हात उगारून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.  महिला पत्रकारानं नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची दादागिरी उघड केली आहे. बुधवारी दुपारी महिला पत्रकार घटकोपर मेट्रो रेल्वे स्टेशनवरून कामावर जाण्याकरिता निघाली होती.  स्टेशनवर रेल्वे कर्मचा-यांवर एक व्यक्ती जोरजोरात ओरडत होती. त्यानंतर महिला पत्रकारानं तिकडे धाव घेऊन काय प्रकार झाला याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला अधिक जवळ गेल्यानंतर तो व्यक्ती जोर जोरात ओरडत मी नगरसेवक विक्रांत चव्हाण असल्याचं सांगत होती. अतिशय वाईट पद्धतीनं नगरसेवक हे मेट्रो रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलत होता. त्यानंतर महिला पत्रकारानं नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.  त्यांना शांता करण्याचा प्रयत्न महिला पत्रकारानं केला. मात्र  उलट नगरसेवकानं महिला पत्रकाराला “तू जा में विक्रांत चव्हाण हू काॅर्पोरेटर”  असं सांगून आरडा ओरड केली.  त्यानंतर महिलेनं मोबाईल काढून नगरसेवकाचा गोंधळ मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगसेवक आणखीच भडकले. त्यांनी महिला पत्रकाराला “चल शानी बन, चल शानी बन” असं सांगून विक्रांत चव्हाण यांनी थेट महिला पत्रकाराच्या हातावर फटका मारला.  यामुळे मेट्रो स्टेशनमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवासी जमण्यास सुरवात झाली आणि सुरक्षा रक्षक येण्याच्या तयारीत असताना विक्रांत चव्हाण यांनी तिथून काढता पाय घेतला.

नगरसेवकाच्या मुजोरीचा व्हिडीओ महिला पत्रकारानं पोस्ट केला. तसेच त्यांची मुजोरीही ट्विट केली. त्यानतंर प्रवाशी आणि इतरांना त्याची दखल घेत नगरसेवकाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.  या पूर्वीही नगरसेवक विक्रांत चव्हाण अनेकदा वादात सापडले होते. वाद आणि विक्रांत चव्हाण यांचं समीकरणच आहे. बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्ये प्रकरणी विक्रांत चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली होती... त्यातच आता विक्रातं चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 03:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading