ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरूणाने जाळले प्रेयसीचे घर

कुटुंबाला घराबाहेर पडता येवू नये यासाठी आरोपीनं त्यांच्या दाराला बाहेरुन कडी लावली होती

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2018 12:08 PM IST

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरूणाने जाळले प्रेयसीचे घर

अजित मांढरे ठाणे, ०३ ऑक्टोबर २०१८- ठाण्याच्या मुंब्रा परिसरात एका माथेफिरुनं एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं घर जाळलंय. पीडित कुटुंबानं केलेल्या पोलीस तक्रारीनुसार मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास आरोपी नितेश मेरोल यांनं पेटलेला कापडी बोळा घराच्या एक्झॉस्ट फॅनच्या खिडकीतून आत टाकला. त्यामुळं काही क्षणात घरात आग लागली. शिवाय या कुटुंबाला घराबाहेर पडता येवू नये यासाठी आरोपीनं त्यांच्या दाराला बाहेरुन कडी लावली होती. मात्र हा प्रकार पीडित कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आग विझवली. हे कुटुंब वेळीच जागे झाल्यामुळं मोठा अनर्थ टळला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे मुंब्रा परिसरातील महात्मा फुलेनगर परिसरात राहणारं हे कुटुंब अक्षरश: हादरुन गेलंय. या प्रकरणी तक्रार दाखल होताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक आणि डॉक्टरच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते आरोपीचा शोध घेत आहेत. गेल्या महिन्यात मुंब्र्यात एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच ही घर जाळण्याची घटना घडल्यामुळे मुंब्रा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही फक्त ठाण्यातील घटना आहे असे नाही राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही एकतर्फी प्रेमातून आतापर्यंत दोन मुलींवर हल्ला करण्यात आला आहे. नागपूरमध्ये फेसबुक रिक्वेस्ट डिलीट केली म्हणून रोहित हेमलानी या युवकाने सानिका प्रदीप थुगांवकर या अठरा वर्षांच्या मुलीची हत्या केली. अनिकते साळवे नावाच्या माथेफिरु तरुणाने भरधाव कारने धडक मारून मयुरी हिंगणेकर या मुलीची हत्या केली आहे.

गणेशपेठ परिसरातील तेलीपुऱ्यात आरोपी अनिकेत साळवे राहत होता आणि जवळच राहणाऱ्या मयुरीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. अनेकदा आरोपीने मयुरीला भेटण्याचा प्रयत्न केला पण तिने भेटण्यास नकार दिला. दरम्यान मयुरी बाईकवर मागे बसून जात असताना आरोपी अनिकेतने त्यांच्या गाडीला जोरदार धडक मारली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर बाईक चालविणारा अक्षयही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीनेच घेतला महिलेचा जीव

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...