मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईजवळ खळबळजनक घटना! 4 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि...

मुंबईजवळ खळबळजनक घटना! 4 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि...

पोलिसांनी तपासाची सूत्र गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी तपासाची सूत्र गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी तपासाची सूत्र गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

ठाणे, 21 डिसेंबर : मीरा भाईंदरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला पोत्यातून फेकून दिले. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्र गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. भाईंदर पश्चिममध्ये चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर आरोपीने वसई वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या मुलीला गोणीत बांधून फेकले. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी चार तासात संबंधित बस चालकाला वसईतून अटक केली आहे. या घटनेत चिमुकलीचा जीव वाचला असून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी मुलीचे अपहरण झाले होते. यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. नेमकं काय घडलं? भाईंदर पश्चिम येथील भोला नगर झोपडपट्टीमधील लहान मुले रविवारी दुपारी एकच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळत होती. त्यानंतर बस तिथून निघून गेली असता तेव्हा सर्व मुले बस मधून खाली उतरले मात्र ही चार वर्षांची चिमुकली गेली कुठे राहिली, याचा शोध घेत कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाणे गाठले. तिथं रीतसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बस चालकांचा शोध लावला असता आरोपी बसचालक वसई माणिकपूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केली असता आरोपीकडून धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीने बसमध्येच लैंगिक अत्याचार करून चार वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसंच चिमुकलीला प्लास्टिकच्या पोत्यात भरून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकले. वालीव पोलिसांनी या चिमुकलीला जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारकामी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल केलं आहे. आरोपीला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती मीरा भाईंदर वसई विराराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत भोसले यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Thane (City/Town/Village), Thane crime news

पुढील बातम्या