News18 Lokmat

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भाजप नेता जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि वॅगनार कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 10:33 AM IST

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भाजप नेता जागीच ठार

भिवंडी, 28 ऑगस्ट : मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि  वॅगनार कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुबंई नाशिक महामार्गावरील सरावली पाडा येथून मृतक गुरुनाथ हे सायंकाळच्या सुमाराला भिवंडीवरून घरच्या दिशेने आपल्या कारने जात होते. त्याच सुमारास विरुद्ध दिशेने जाणाऱ्या खाजगी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने गेली असता त्याच वेळी गुरुनाथ यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात कार आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोलगट भागात जाऊन आदळल्या. या अपघातात गुरुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला तर खाजगी बसमधील 15 ते 20 प्रवासी बचावले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आहेत. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

 

Loading...

बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...