Home /News /news /

भाजपच्या लोकांचा जीवही ठाकरे सरकारनेच वाचवला, गुलाबराव पाटलांना टोला

भाजपच्या लोकांचा जीवही ठाकरे सरकारनेच वाचवला, गुलाबराव पाटलांना टोला


'ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीसह पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळं अशा संकटांचा सामना केला.

'ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीसह पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळं अशा संकटांचा सामना केला.

'ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीसह पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळं अशा संकटांचा सामना केला.

    जळगाव, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government 2 years) दोन वर्ष पूर्ण झाली आहे. विरोधकांनी कोरोनाच्या महामारीवरून सरकारवर टीका केली आहे. तर 'कोरोनाच्या (corona) काळात सरकारने जनतेला वाचवण्याला प्राधान्य दिलं. विरोधक सरकारच्या कार्यपद्धतीवर कितीही टीका करत असले तरी त्यांच्या लोकांचा जीव या सरकारने वाचवला आहे', अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी भाजपला (bjp) टोला लगावला. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीवर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला. 'जगाच्या आणि देशातील कोरोना काळातील संपूर्ण आकडेवारी माझ्याकडे आहे. एका माणसावर किती खर्च झाला हे काढू शकतो. मी सुद्धा गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. कधीही ५० टक्के डीपीटीसीचा निधी हा कोरोनासाठी राखीव ठेवा लागला. कोणत्याही सरकारच्या काळात असा प्रसंग आला नाही. पण, ठाकरे सरकारने या कोरोनाचा काळाचा सामना केला आणि 'सर सलाम तो पगडी पचास' असं धोरण डोळ्यासमोर ठेवून लोकांना वाचवलं. विरोधक सरकारच्या कार्यपद्धतीवर कितीही टीका करत असले किंवा काहीही म्हटलं तरी त्यांच्याही लोकांना याच सरकारने वाचवलं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 'ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीसह पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळं अशा संकटांचा सामना केला. गारपीट असेल किंवा कोल्हापूरमधील महापूर असेल या सगळ्या काळात आर्थिक तूट असताना सुद्धा सरकारने आर्थिक मदत केली आहे, असंही पाटील म्हणाले. 'रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचणीपासून ते त्यांच्या जेवणापर्यंत सरकारने सोय केली आहे. साहजिक या काळात विकासाची काही काम थांबली. केंद्र सरकारने आर्थिक मदत पुरवली नाही पण तरीही ठाकरे सरकारने कुठेही कमी पडू दिले नाही, असंही पाटील म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या