शौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', सर्जिक स्ट्राईकचा बदला घेणाऱ्या दहशतवाद्यांना केली मदत

शौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', सर्जिक स्ट्राईकचा बदला घेणाऱ्या दहशतवाद्यांना केली मदत

डीएसपी देविंदर सिंह (DSP Davinder Singh) याला गेल्या शनिवारी दोन दहशवाद्यांसोबत कुलगामनजिक तपासावेळी ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर घरी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक हत्यारं पोलिसांच्या हाती लागली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 14 जानेवारी : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) शौर्य पुरस्कार मिळालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दहशवाद्यांना सोबत घेऊन जाण्यात आणि त्यांना घरी आश्रय दिल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. या बातमीमुळे संपूर्ण देशात आणि श्रीनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. डीएसपी देविंदर सिंह (DSP Davinder Singh) याला गेल्या शनिवारी दोन दहशवाद्यांसोबत कुलगामनजिक तपासावेळी ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर घरी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक हत्यारं पोलिसांच्या हाती लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देविंदर सिंहच्या घरी जम्मू काश्मीर पोलिसांनी छापेमारी केली. देविंदर सिंहने हिज़्बुल मुजाहिदीनचा (Hizbul Mujahideen)  कमांडर नावीद बाबू आणि त्याचे दोन सहकारी इरफान आणि अल्ताफ काश्मारीच्या शोपियांमध्ये त्याच्या घरापर्यंत आणलं होतं. त्यानंतर तो शनिवारी त्याना जम्मूला घेऊन जाणार होता. पण सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मूवरून ते दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात होते.  परंतू श्रीनगरच्या 50 किलोमीटर लांब वानपोहमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

ज्याने देशासाठी शौर्य पुरस्कार मिळवला तो करत होता दहशतवाद्यांना मदत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसपी देविंदर हा फोन करण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करायचा. यातल्या काही नंबरवरून तो दहशतवाद्यांशी बोलायचा. सगळ्यात धक्कादायक म्हणदजे हे दहशतवादी सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतात मोठा हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते. यामध्ये दहशतवाद्यांचा मोठा ग्रुप काम करत होता. DSPला या सगळ्या दहशतवाद्यांना राहण्याची व्यवस्था करायची होती.

DSP ने दहशतवाद्यांनासाठी केली राहण्याची व्यवस्था

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आयएसआयच्या सूचनेनुसार खलिस्तान दहशतवाद्यांशी संपर्क होता आणि डीएसपी देविंदर सिंह या दहशतवाद्यांची दिल्ली आणि चंडीगड येथे रहाण्याची व्यवस्था करत होता. असा तपास यंत्रणांचा संशय आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर मीर बाजारमध्ये जेव्हा देविंदर सिंहला पकडण्यात आलं तेव्हा हिजबुल मुजाहिदीन दहशतवाद्यांना तो काश्मीरवरून चंदीगडला घेऊन जात होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या दहशवाद्यांनी देविंदरच्या घरी जेवण केलं आणि रात्र घालवली. या दहशतवाद्यांची ओळख शीर्ष हिजबुल कमांडर नवीद बाबू आणि त्याचे दोन साथीदार इरफान आणि अल्ताफ अशी झाली.

कसे सापडले पोलिसांच्या ताब्यात ?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देविंदर सिंह तीन दहशवाद्यांना घेऊन साध्या कपड्यांमध्ये शनिवार सकाळी 10च्या सुमारास घरातून निघाला. पोलिसांनी श्रीनगरवरून तब्बल 60 किलोमीटर लांब त्यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घाबरल्यामुळे त्यांच्याकडून गडबड झाली आणि पोलिसांच्या चौकशीला वेगवेगळी उत्तरं दिली. याचा पोलिसांना संशय आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर पोलिसांनी देविंदर सिंहच्या घराचीदेखील झडती घेतली.

Published by: Renuka Dhaybar
First published: January 14, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading