S M L

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, 10 जवान जखमी तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. तर एक पोलीस शहीद झाला.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 22, 2018 08:21 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, 10 जवान जखमी तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर,ता.21 जून : जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफ च्या संयुक्त तुकडीवर ग्रेनेड हल्ला केला. कारवाईसाठी मोहिमेवर असलेल्या या तुकडीवर नागरिकांनी दगडफेक केली आणि त्यानंतर ग्रेनेडफेकला यात 10 जवान जखमी झाले. तर अनंतरनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

हिजबुल मुजाहीद्दीनने त्राल हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. हिजबुलचा प्रवक्ता बरहनुद्दीन यानं सुरक्षादलांवर आणखी हल्ले होतील अशी धमकीही दिली आहे.

दरम्यान आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. तर एक पोलीस शहीद झाला. ठार झालेल्या अतिरेक्यांमध्ये जम्मू-कश्मीर इस्लामिक स्टेट (ISJK) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या दाऊद आणि इतर तीन अतिरेक्यांचा समावेश आहे.

हेही वाचा...

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

Loading...
Loading...

 राहुल गांधींनी का केली महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उचलबांगडी,पहा स्पेशल रिपोर्ट

 एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीश आरोपीच्या पिंजऱ्यात,हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

 राज्याच्या जल आराखड्याला मंजुरी, महत्वाच्या नद्यांच्या पाण्याचं होणार नियोजन

 दस्तुरखुदद् शिवाजी महाराजांनी लिहीलेलं पत्र सापडल्याचा इतिहास संशोधकाचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 08:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close