सीमेवर शहीद झाला जवान, 3 महिन्यांची मुलगी झाली पोरकी

दीड वर्षांपूर्वी जाधव यांचा विवाह झाला होता. प्रकाश यांच्या जाण्यामुळे त्यांची 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी झाली आहे.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 27 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. प्रकाश जाधव असं या जवानाचं नाव आहे. दहशतवादी चकमकीत हा जवान शहीद झाला आहे.

रेडवानी पुलगाममध्ये राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं आहे. प्रकाश जाधव हे निपाणी तालुक्यातील बुधीहाळ गावचे होते.

जाधव यांच्या जाण्याने बुधीहाळ गावावर शोककळा पसरली आहे. 28 वर्षीय प्रकाश जाधव दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. जाधव मराठा लाइट इंफंट्रीचे जवान आहेत.

जाधव यांच्या जाण्याने बुधीहाळ गावावर शोककळा पसरली आहे. 28 वर्षीय प्रकाश जाधव दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. जाधव मराठा लाइट इंफंट्रीचे जवान आहेत.

दीड वर्षांपूर्वी जाधव यांचा विवाह झाला होता. प्रकाश यांच्या जाण्यामुळे त्यांची 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी झाली आहे.

दीड वर्षांपूर्वी जाधव यांचा विवाह झाला होता. प्रकाश यांच्या जाण्यामुळे त्यांची 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी झाली आहे.

जाधव यांचे पार्थिव आज संध्याकाळी बेळगावमध्ये आणण्यात येणार आहे. उद्या बुधीहाळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

तर सीआरपीएफचे दोन जवानदेखील यात किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलांना माहिती मिळाली की, दहशतवादी दक्षिणी कश्मीरमध्ये कुलगाम सेक्टरमध्ये लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे आता शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

संशयीत परिसरात भारतीय सैन्याने घेरा घातला आहे. त्यामुळे संशयित परिसरात भारतीय सैन्याने घेरा घातला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. त्यात राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं आहे.अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. त्यात राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं आहे.

संशयित परिसरात भारतीय सैन्याने घेरा घातला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. त्यात राष्ट्रीय रायफलच्या प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 02:50 PM IST

ताज्या बातम्या