‘हैदर’ सिनेमातला कलाकार झाला दहशतवादी, एनकाऊंटरमध्ये खात्मा

मुलगा सुरक्षित असावा म्हणून साकिबची आई पीर फकीर यांच्याकडेही गेली होती. पीर फकिरांकडून तावीजही घेतले होते.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 12:40 PM IST

‘हैदर’ सिनेमातला कलाकार झाला दहशतवादी, एनकाऊंटरमध्ये खात्मा

श्रीनगर येथील मुजगुंड येथे एनकाऊंटरमध्ये मारला गेलेला १७ वर्षीय दहशतवादी साकिब बिलालने शाहीद कपूरच्या हैदर सिनेमात काम केले आहे. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या या सिनेमात साकिबने कॅमिओ केला होता.

हिंसा घडत असताना बसमधून पळून जाण्याच्या सीनमध्ये तो होता. हाजिन बांदीपोरा येथील हाजिन येथे राहणारा साकिब बिलाल सिनेमात हिंसेपासून पळ काढत असतो. मात्र खऱ्या आयुष्यात त्याने जगण्यासाठी हिंसेचाच स्वीकार केला होता.

बिलालला गेल्या रविवारी सेनेने लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. थिएटर आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या साकिब फुटबॉल, कबड्डी आणि तायक्वांडो या खेळात प्रवीण होता.

Loading...

३१ ऑगस्टला तो अजून एका मुलासोबत घरातून बेपत्ता झाला. साकिबने दहशतवादाचा रस्ता कसा आणि कधी पकडला याबद्दल घरच्यांना काहीच माहीत नाही. घरातून निघून त्याने आणि त्याच्या मित्राने  सरळ दहशतवादाचा रस्ता धरला.

बेपत्ता झाल्यानंतर त्याला घरच्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. मरण्यापूर्वी त्याचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन तो दहशतवादी संघटनेला मिळाल्या असल्याचं कळलं. त्याला इंजीनिअर व्हायचे होते. तो डिस्टिंक्शनने १० वी पास झाला होता.

११ वी मध्ये तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित घेऊन शिक्षण घेत होता. त्याला फुटबॉल खेळायला आणि पाहायला प्रचंड आवडायचं.

एका संपन्न शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साकिबने थिएटर कलाकार म्हणून टागोर हॉलमध्ये झालेल्या ‘व्यथ छि यहए’ (यह नदी है) नाटकात भाग घेतला होता. त्याला यात पुरस्कार मिळाला होता. ओडिसामध्येही त्याने हे नाटक केलं होतं.

मुलगा सुरक्षित असावा म्हणून साकिबची आई पीर फकीर यांच्याकडेही गेली होती. पीर फकिरांकडून तावीजही घेतले होते. पण आईची ही मेहनत फळाला आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...