मोठा कट ! ISI भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याच्या तयारीत

मोठा कट ! ISI भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याच्या तयारीत

या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांकडून सर्व लष्करी तळांवरील विशेषतः जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मार्च : कुरापती पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराविरोधात मोठा कट आखत असल्याची माहिती समोर आली आहे. 'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मिलिट्री इंटेलिजन्स (MI)आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स(ISI)भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणामध्ये विष मिसळण्याचा कट आखत आहेत. यासाठी योजनादेखील आखण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांकडून सर्व लष्करी तळांवरील विशेषतः जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, जेवणाचे साहित्य खरेदी करताना सावधानता बाळगण्यासही सांगण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून जवानांसाठी असणाऱ्या अन्न-धान्य गोदामांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली आहे. पण तरीही सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती कमी झालेल्या नाहीत.

''काश्मीरमध्ये सक्रीय असणारे एमआय आणि आयएसआय एजंट सुरक्षा दलांच्या रेशन साठ्यातील सामानामध्ये विष मिसळण्याचा कट आखत आहेत'', असा दावा पाकिस्तानी क्रमांकावरुन केलेल्या चॅटच्या आधारे करण्यात आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

मसूदविरोधातील पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द

दुसरीकडे, भारत सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझहरविरोधातील सर्व पुराव्यासंहीत पाकिस्तानला डॉजियर सोपवले आहे.

याव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्तावही दिला आहे. या प्रस्तावावर पुढील 10 दिवसांमध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

VIDEO: शरद पवार म्हणाले... 'मतं दुसऱ्यांना देता आणि आरक्षणाचा प्रश्न मी सोडवावा?'

First published: March 2, 2019, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading