अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघींचा मृत्यू

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघींचा मृत्यू

निर्मलाबैन ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दोघींची नावं आहेत. या दोघीही पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या रहिवाशी आहेत. या दोघीही गुजराथमधील वलसाडच्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत होत्या.याशिवाय महाराष्ट्रातील 8 भाविकही जखमी झाले आहेत.

  • Share this:

10 जुलै : अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 यात्रेकरूंसह 7 जण ठार तर 12 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 5 महिला यात्रेकरूंचा समावेश आहे.

मृतांमध्ये दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या आहेत. निर्मलाबैन ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दोघींची नावं आहेत. या दोघीही पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या रहिवाशी आहेत. या दोघीही गुजराथमधील बलसाडच्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत होत्या.याशिवाय महाराष्ट्रातील 8 भाविकही जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील जखमींची नावं प्रकाश विजनलाल(60),रमेश बडोला(45 ), तिताभाई मंजीलाल(55),उजालिता डोगरा(50),विष्णू डोगरा(55), बाघी सिंह(50),दक्षा प्रणोदे(59) ,छाया कुमार(60)  आहेत.

काश्मिरमधील तणावामुळे गुप्तहेर खात्याने आधीच या संभाव्य हल्ल्याची सुचना दिली होती. त्यामुळे यावर्षी यात्रेचे संरक्षण वाढवले होते.

हल्ला हा अमरनाथ यात्रेच्या गुजरात बसवर झालाय. या बसमधून 17 यात्रेकरू प्रवास करत होते. रात्री सव्वा आठच्या सुमाराला दहशतवाद्यांनी GJ09 Z 9976 या क्रमांकाच्या बसवर बेछूट फायरिंग केलं, ही बस अमरनाथ मंदिराचं दर्शन घेऊन मीर बाजारला जात होती.गुजराथमधीलही बस यात्रेच्या मुख्य  ताफ्यात नव्हती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून, हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा मार्गावरचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

जखमी यात्रेकरूंना श्रीनगर आणि अनंतनागमधील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 09:49 PM IST

ताज्या बातम्या