Elec-widget

काश्मीरमध्ये लष्करीतळाववर दहशतवादी हल्ला, 1 जवान ठार

काश्मीरमध्ये लष्करीतळाववर दहशतवादी हल्ला, 1 जवान ठार

जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय. जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवान लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. या दहशतवादी हल्ल्यात एक जवान आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झालाय. लष्कराने ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय.

  • Share this:

10 फेब्रुवारी, श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय. जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवान लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. या दहशतवादी हल्ल्यात एक जवान आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झालाय. लष्कराने ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून दहशतवाद्यांनी सुंजवान लष्करी कॅम्पवर गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात ३-४ जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कॅम्पमध्ये दहशतवादी आणि लष्कर यांच्यात अद्याप चकमक सुरुच आहे. तर, दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराला अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत असून लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...