S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत; गुप्तचर यंत्रणांची माहिती

दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीमध्ये आहेत. यावेळी देशातील प्रमुख शहरं त्यांच्या रडारवर आहेत.

Updated On: Mar 25, 2019 05:37 PM IST

दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत; गुप्तचर यंत्रणांची माहिती

मुंबई, 25 मार्च : दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा ISIS, अल कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा ISIS आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. तसेच दहशतवाद्यांच्या रडारवर आता देशातील इतर ठिकाणं असल्याची महिती देखील समोर येत आहे. त्यामुळे प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळवून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


टॉपचे दहशतवादी ठार


सध्या काश्मीरमध्ये देखील लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत असून दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम उघडण्यात आली आहे. कारवाई दरम्यान लष्करासाठी देखील काही मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली आहेत. त्यामुळे जवान शहीद होण्याचं किंवा जखमी होण्याचं प्रमाण कमी होईल. मागील काही दिवसांमध्ये अनेक टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला. त्यामध्ये पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा देखील समावेश आहे.


VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close