हरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा

हरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा

भारतातल्या काही मिशिदींना पाकिस्तानातून अर्थपुरवढा होतो का असा प्रश्न आता निर्माण झाला असून त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

  • Share this:

चंदीगड,ता.15 ऑक्टोबर : हरियाणातल्या पलवल इथं उभारण्यात येत असलेल्या मशिदीसाठी पाकिस्तानातला कुख्यात दहशतवादी हाफीज सईदने पैसा पुरवल्याचं स्पष्ट झालंय. हाफीज हा भारतासाठी मोस्ट वाँटेंड दहशतवादी असून त्यानेच 'लष्कर ए तोयबा'ची स्थापना केलीय. दहशतवाद्यांना अर्थपुरवढा करणाऱ्या प्रकरणांची चौकशी करताना NIA ला ही खळबळजनक माहिती मिळालीय.

या प्रकरणी मशिदीच्या मौलानाला अटक करण्यात आलीय. हरियानातल्या पलवल जवळच्या उत्तरा या गावात एका भव्य मशिदीचं बांधकाम सुरू आहे. 'खुलाफा-ए-रशीदीन' असं या मिशिदीला म्हटलं जातं. NIA ला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काही लोकांवर पाळत ठेवत त्याचा माग काढला आणि त्यात अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या.

NIAने मशिदीचा इमाम मोहम्मद सलमान याच्यासह तीन लोकांना दिल्लीतून अटक केलीय. सलमान हा काही वर्ष दुबईत नौकरीसाठी होता. त्याच वेळी त्याचा संपर्क लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेशी आला होता. त्यानंतर तो सतत त्यांच्या संपर्कात होता.

हाफिज सईद आणि तोयबाशी संबंधीत पाकिस्तानातली स्वयंसेवी संघटना 'फलाह-ए-इंन्सानियत फाउंडेशन'कडून यांना पैसे पुरवले जात होते. आत्तापर्यंत 70 लाख रूपये सलमानला मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. सलमानच्या मुलींच्या लग्नासाठीही पाकिस्तानातून पैसे मिळाल्याचही स्पष्ट झालंय.

NIA ने आता मशिदीला मिळालेल्या देणग्यांची चौकशी सुरू केली असून त्यात अनेक जण NIAच्या रडावर आले आहेत. भारतातल्या काही मिशिदींना पाकिस्तानातून अर्थपुरवढा होतो का असा प्रश्न आता निर्माण झाला असून त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

गौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका

 

First published: October 15, 2018, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading