BREAKING: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ला कुठे शांत होत नाही तोच शोपिंयोमध्ये दहशवादी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 09:12 PM IST

BREAKING: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

जम्मू काश्मीर, 21 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला आहे. नागिशरण शोपियानमध्ये हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून झालेला आत्मघाती हल्ला कुठे शांत होत नाही तोच हा दुसरा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यामध्ये ग्रेनडचा वापर केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हातगोळा आणि गोळीबार करत दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येत आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार अजूनही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.


Loading...


मोदी सरकारचा पाकिस्तानला तिसरा धक्का, रावी नदीचं पाणी रोखणार!

पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला एक-एक झटका द्यायला सुरूवात केली आहे. यापूर्वीच भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले. या दोन धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर आता पाकिस्तानला आता तिसरा धक्का दिला आहे.

मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

काश्मीरमध्ये स्फोटक स्थिती, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

पूलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातली परिस्थिती सर्वाधिक खराब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारने परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी अनेक उपाययोजना केल्यात मात्र त्याचा फायदा झाला नाही. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच राज्यपालपदावर राजकीय व्यक्तिची निवड केली गेली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही असच दिसून येतं आहे.

लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहिम राबवली आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं असा दावा केला. मात्र या करावाईमध्ये लष्करी जावनही मोठ्या प्रमाणावर शहीद झाले ही वस्तुस्थिती आहे. दोन अतिरेक्यांचा खात्मा करताना एका जवानाला वीर मरण पत्करावं लागलं.

साउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP)  ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...