ब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला? कारने तिघांना चिरडले

ब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला? कारने तिघांना चिरडले

लंडनमधला सर्वाधिक सुरक्षीत भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलीसांनी म्हटलंय

  • Share this:

लंडन,ता.14 ऑगस्ट : लंडनमधला सर्वाधिक सुरक्षीत भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तिन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलीसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. पोलीसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते. तर संसद भवन असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्थाही असते. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेतास वाजता भरधाव वेगाने आलेल्या कारने सुरक्षा बॅरीकेट्स तोडून सायकलस्वार आणि काही नागरिकांना चिरडले. यात तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ही कार चालवणारा युवक वीस वर्षांचा असून तो तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. हा दहशतवादी हल्ला समजून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. ब्रिटनची गुप्तचर संस्था 'एम15' आणि दहशतवादी विरोधी पथक या युवकाची चौकशी करत आहेत. ही कार प्रचंड वेगाने येत होती. तीने सर्व सुरक्षा अडथळे भेदून कार सायकलस्वारांच्या अंगावर घातली.

नंतर ही कार डिव्हायडरला धडकली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. संसद सुरू नसल्याने संसद भवनात आणि तिथल्या कार्यालयांमध्ये फारशी माणसं नव्हती. पण संसद भवन बघण्यासाठी जगभरातले पर्यटक या भागात येत असल्याने हा भाग कायम वर्दळीचा असतो. या आधीही अनेकदा लंडनमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत.

First published: August 14, 2018, 6:02 PM IST

ताज्या बातम्या