Home /News /news /

जातीय भेदभावाचा भयंकर प्रकार; शाळेतील विद्यार्थ्यांचा दलित महिलेच्या हातचं अन्न खाण्यास नकार

जातीय भेदभावाचा भयंकर प्रकार; शाळेतील विद्यार्थ्यांचा दलित महिलेच्या हातचं अन्न खाण्यास नकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

शाळा जेथे सर्व धर्म समभाव, एकतेचे आणि सार्वभौमत्वाचे धडे दिले जातात. त्या शाळेत शिकणाऱ्या सवर्ण विद्यार्थ्यांनी दलित महिलेच्या हातचं अन्न खाण्यास नकार दिला.

    देहरादून, 22 डिसेंबर : उत्तराखंडमधील (Uttarakhand News) चंपावत जिल्ह्यात सवर्ण विद्यार्थ्यांनी दलित महिलांनी तयार केलेलं जेवण खाण्यास नकार दिला. या घटनेनंनतर राज्यातील सामाजिक भेदभाव आणि जाती-पातीवरील पूर्वग्रह दूषित असल्याचं दिसून येत आहे. अनुसूचित जातीतील अनिता देवी (नाव बदललं आहे) यांना नुकतच सुखीढांग भागातील एका गावात सरकारी माध्यमिक शाळेत आचारी म्हणून नियक्त करण्यात आलं होतं. त्यांच्यावर 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मिड डे मिल (Mid Day Meal) तयार करण्याची जबाबदारी होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी सांगितलं की, अनिता रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशी सर्वण विद्यार्थ्यांनी जेवण केलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी येथे जेवण्यास नकार दिला. सुरुवातील विद्यार्थी असं का करीत असल्याचं कळत नव्हतं. एकूण 57 विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जातीच्या 16 विद्यार्थी जेवले. मुख्याध्यापक म्हणाले, सरकारी नियमांनुसार नियुक्ती.. मुख्याध्यापक सिंह म्हणाले की, त्यांनी सरकारी नियमांनुसार नियुक्ती केली आहे. ते पुढे म्हणाले की, आम्हाला भोजनमाता म्हणजेच आचारीच्या पदासाठी 11 जणांकडून अर्ज आले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित एका बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी त्यांना पौष्टीक आहार देण्यासाठी मिड डे मीलची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. सुखीढांग शाळेत आचारीचे दोन पद होते. शकुंतला देवी निवृत्त झाल्यानंतर येथे अनिता देवी नियुक्त झाल्या. हे ही वाचा-21 वर्षाखालील सज्ञान मुलं लिव्ह इनमध्ये राहू शकतात का? वाचा कोर्टाचा निर्णय सवर्ण जातीच्या योग्य उमेदवाराची नियुक्ती न केल्याचा आरोप... जेवणावर बहिष्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावरुन मॅनेजमेंट समिती आणि मुख्याध्यापकांवर आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सवर्णातील योग्य उमेदवाराची निवड करण्यात आलेली नाही. शिक्षक संघाचे अध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी सांगितलं की, 25 नोव्हेंबरच्या ओपन मीटिंगमध्ये आम्ही पुष्पा भट्ट यांची निवड केली होती. त्यांचा मुलगाही शाळेतच शिकतो. त्यांनादेखील गरज होती. मात्र मॅनेजमेंट समिती आणि मुख्याध्यापकांनी तिला न घेता एका दलित महिलेची नियुक्ती केली. तर जोशी पुढे म्हणाले की, सवर्ण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सवर्ण जातीच्या महिलेची भोजनमाता म्हणून निवड करायला हवी होती.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: School children, Uttarakhand

    पुढील बातम्या