लॉकडाऊनमध्ये सलमान-जॅकलिनचा रोमान्स, 'तेरे बिना'चा टीझर रिलीज, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये सलमान-जॅकलिनचा रोमान्स, 'तेरे बिना'चा टीझर रिलीज, पाहा VIDEO

सलमानचं गाणं 'तेरे बिना'चा टीझर नुकताच रिलीज झाला असून यात तो जॅकलिन फर्नांडिसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं आता अभिनयासोबत सिंगिंगमध्येही नाव कमवायला सुरुवात केली आहे. सलमाननं त्याच्या काही सिनेमात या आधीही गाणी गायली होती. पण आता लॉकडाऊनमध्ये तो आणखी एका गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमानचं गाणं 'तेरे बिना'चा टीझर नुकताच रिलीज झाला असून यात तो जॅकलिन फर्नांडिसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

सलमान खानचं गाणं तेरे बिनचा टीझर नुकताच रिलीज झाला. यामध्ये जॅकलिन आणि सलमान यांची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं स्वतः सलमाननं गायलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये या गाण्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

गाण्याचं दिग्दर्शन स्वतः सलमान खाननं केलं आहे. हे गाणं सुद्धा सलमाननंच गायलं आहे. गाण्याच्या रचना ही शब्बीर अहमद यांची आहे. तर म्युझिक अजय भाटिया यांनी दिलं आहे. सलमान आणि जॅकलिन यांच्या मुख्य भूमिका असलेले हे गाणं येत्या 12 मे ला रिलीज होणार आहे.

लॉकडाऊनमुळे सलमान खान सध्या त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधताना आणि सर्वांनाच कोरोना व्हायरसबाबत जागरुकतेचा संदेश देताना दिसत आहे. या ठिकाणी सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलविरा आणि अर्पिता सुद्धा पनवेल फार्म हाऊसवर आहेत. याशिवाय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यूलिया वंतूर सुद्धा याच ठिकाणी अडकले आहेत.

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सापडली आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे

First published: May 10, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading