News18 Lokmat

दहावीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर, नवीन व्यवसायचा पेपर आता 17 मार्चला होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. तर बारावीचे पेपर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2017 05:14 PM IST

दहावीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर, नवीन व्यवसायचा पेपर आता 17 मार्चला होणार

29 नोव्हेंबर, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. तर बारावीचे पेपर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे.

दरम्यान, दहावीच्या वेळापत्रकात एक किरकोळ बदल करण्यात आलाय. यापूर्वी नवीन व्यवसायचा पेपर हा 5 मार्चच्या द्वितीय सत्रात म्हणजेच दुपारच्या वेळेत होणार होता. तो आता 17 मार्चला पहिल्या सत्रात म्हणजेच सकाळच्या वेळेत होणार आहे. पालक-विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक हे www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. सोशल मीडियावरील वेळापत्रकाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...