महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला. एका 56 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नव रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी - #Breaking राज्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईमध्ये मृत्य

दरम्यान, भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत.

देशात दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसच 50 रुग्ण आढळले होते. तर शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळले. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 रुग्ण बरे झालेत, तर आता मृतांची संख्या 5वर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading