जम्मू आणि काश्मीरबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं जम्मू आणि काश्मीरमध्ये दिर्घकाळ राज्य केलं. तर तब्बल तास वेळा राष्ट्रपती राजवट या राज्यानं अनुभवली आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 19, 2018 04:08 PM IST

जम्मू आणि काश्मीरबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

नवी दिल्ली,ता.19 जून :  जम्मू आणि काश्मीरमध्ये काही काळ सोडला तर कायम राजकीय अस्थिरता होती. हिंसाचार, लष्करी कारवाई आणि अतिरेक्यांच्या कारवायांमुळं भारताचं हे नंदनवन कायम धगधगत असतं. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं जम्मू आणि काश्मीरमध्ये दिर्घकाळ राज्य केलं. तर तब्बल तास वेळा राष्ट्रपती राजवट या राज्यानं अनुभवली आहे.

 

1) जम्मू काश्मीर विधानसभेत एकूण ८७ जागा आहेत. पीडीपीकडे २८, भाजपा २५, नॅशनल कॉन्फरन्स १५, राष्ट्रीय काँग्रेस १२ आणि इतरांना ७ जागा आहेत.

2) भाजप इतिहासात पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी झाला.

3) मेहबुबा मुफ्ती या राज्याच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत.

4) डिसेंबर २०१४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणूका झाल्या. त्यानंतर पीडीपी आणि भाजपाने युती करून सरकार स्थापन केले होते.

5) १ मार्च २०१५ रोजी पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

6) जानेवारी २०१६ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्री झाल्या.

7) मुफ्ती मोहम्मद सईद हे मेहबूबा मुफ्ती यांचे वडील होते.

8) ४ एप्रिल २०१६ रोजी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्याच्या पहिला महिला मुखमंत्री म्हणून शपथ घेतली.

8) आत्तापर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल सात वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

9) शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार बरखास्त करून 26 मार्च 1977 ते 9 जुलै 1977 असं तब्बल 105 दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट होती.

10) जम्मू आणि काश्मीरचा विचार करताना नेहमी फक्त `खोऱ्या`चीच चर्चा होते. मात्र जम्मू, लेह आणि लद्दाख अशा चार विभागांचं मिळून हे राज्य आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close